Home » माझा बीड जिल्हा » रोटरी क्लब माजलगावची भाऊबीज

रोटरी क्लब माजलगावची भाऊबीज

रोटरी क्लब माजलगावची भाऊबीज

रविकांत उघडे /डोंगरचा राजा आँनलाईन

*ऊसतोड महिला मजुरांना साडी व फराळाचे वाटप*

*ऐन दिवाळीच्या सणात ऊसतोडणी साठी लऊळ शिवारात आलेल्या महिला मजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेन्ट्रल च्या वतीने भाऊबीजेचे औचित्य साधून दि.9 नोव्हेंबरला साडीचोळी व फराळाचे वाटप करण्यात आले आहे.*
पाठीवर बिऱ्हाड बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी अशी अनेक कुटुंबे गावोगाव व रानोराण उसाच्या फडात वणवण फिरत असतात,ऊन वारा पाऊस व थंडीची तमा न बाळगता या कुटुंबाला ना सण असतो ना उत्सव. अशा वंचित व गरीब कुटुंबात मायेची फुंकर घालण्यासाठी रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेन्ट्रल दरवर्षी दिवाळी सणात फराळाचे वाटप करून खारीचा वाटा उचलत आहे.
यावर्षी माजलगाव जवळील लऊळ शिवारात अशी अनेक कुटुंब ऐन दसरा दिवाळीच्या सणात ऊस तोडणीसाठी आली आहेत.यात पुरुषांबरोबर महिलांनाही ऊस तोडणीचे काम करावे लागते,अशा ऊसतोड महिला कामगारांना भाऊबीज सुद्धा साजरी करताआली नाही ही खंत त्यांच्या मनात राहू नये म्हणून रोटरी क्लबने भावाची भूमिका बजावत लऊळ शिवारातील वेगवेगळ्या चार ऊस फडावर प्रत्यक्ष जाऊन ऊस तोड कुटूंबाना रोटरी सदस्यांनी साडीचोळी व फराळाचे वाटप केले.अनाहूतपणे आलेल्या या अनोख्या दिवाळी भाऊबीज भेटीने अनेक ऊसतोड महिलांचे डोळे पाणावले होते.
यावेळी माजलगाव रोटरी क्लब सेन्टरलचे अध्यक्ष हनुमान कासट,रोटरीयन अण्णासाहेब तौर,प्रभाकर शेटे,गव्हाणे,प्रा.नीलकंठ साबळे,अंकुश राठोड,गजेंद्र खोत,रणजित राठोड विनोद जाधव,सुनील शिंदे,सज्जन काशिद,प्रताप धपाटे,विनायक देशमुख, लऊळचे ग्रामस्थ माजी सरपंच बाळासाहेब शिंदे,बारीकराव शिंदे,भागवत शिंदे,सिद्धेध्वर राठोड, सुभाष राठोड,हनुमान शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.