Home » माझा बीड जिल्हा » आ.देशमुखांनी केले पाणीपुरवठाचे उदघाटन

आ.देशमुखांनी केले पाणीपुरवठाचे उदघाटन

आ.देशमुखांनी केले पाणीपुरवठाचे उदघाटन

डोंगरचा राजा /आँनलाईन..

आज विभागीय आयुक्तालयात आयोजित पाणीपुरवठा योजनांचे इ भूमिपूजन व आढावा बैठक प्रसंगी मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन करण्यात आले या वेळी बीड जिल्ह्यातील योजनांचे भूमिपूजन आ आर टी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले

विभागिय आयुक्तालय संभाजीनगर येथे विधानसभेचे अध्यक्ष ना हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजनांचे इ भूमिपूजन व पाणीटंचाई वरती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी मराठवाड्यातील राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल सहित जलस्वराज्य योजनांचे भूमीपूजन करण्यात आले या वेळी ना हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संभाजीनगर,जालना जिल्हातील ना बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी ,नांदेड, लातूर तसेच आ आर टी देशमुख यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून करण्यात आले मराठवाड्यासाठी एकूण 425 गावातील 199 योजनेचे भूमीपूजन करण्यात आले त्या साठी 1251 कोटींची तरतूद करण्यात आली आहे बीड जिल्हासाठी 175 कोटी ची तरतूद करण्यात आली असून त्यात माजलगाव 6 कोटी धारूर 6 कोटी व वडवणी करिता 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे लवकरच या भूमिपूजन झालेल्या योजनां कार्यान्वित होतील

*बीड जिल्ह्यात वॉटर ग्रीड योजना राबवावी- आ आर टी देशमुख*

महाराष्ट्रात सर्वत्र गुजरात राज्याच्या धर्तीवर वॉटर ग्रीड योजना राबविणे सुरू आहे बीड जिल्ह्यात माजलगाव, मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा या सारखे प्रकल्प असून या प्रकल्पात वाया जाणारे पाणि जमा झाल्यास जिल्हातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर होऊ शकतो या साठी वॉटर ग्रीड योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी आ आर टी देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कडे केली आहे

*विद्युत जोडणी पूर्ववत करा*
आज झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी आ आर टी देशमुख यांनी माजलगाव धरण परिसरातील विहिरी व बोअर वरील खंडित केलेली विद्युत जोडणी किमान जानेवारी पर्यंत पूर्ववत करावी अशी मागणी आ आर टी देशमुख यांनी मंत्रीमहोदय व विभागीय आयुक्त भापकर यांच्या कडे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.