Home » माझा बीड जिल्हा » “बीडच्या पालकमंत्री अदृश्य” — चव्हाण

“बीडच्या पालकमंत्री अदृश्य” — चव्हाण

“बीडच्या पालकमंत्री अदृश्य” — चव्हाण

डोंगरचा राजा / आँनलाईन

“राज्यात दुष्काळसदृश्य; बीडच्या पालकमंत्री अदृश्य”

▪ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची टीका

अंबाजोगाई : संपूर्ण राज्यात सध्या दुष्काळाची परीस्थिती आहे. मत्र सरकारला याचे गांभीर्य नाही. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत तर काही मंत्री रात्री अंधारात टॉर्च लावून दुष्काळाची पाहणी करत आहेत. भाजप सरकारने दुष्काळाची क्रूर थट्टा चालवली आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अंबाजोगाईतील जनसंघर्ष यात्रेत बोलताना केली.

महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया पसरलेली असतांना शासनाच्या वतीने केवळ घोषणाबाजी केली जात आहे, फसवे जीआर काढले जात आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत गंभीर, मध्यम, अशी दुष्काळाची वर्गवारी कधीच अस्तित्वात नव्हती. ती या सरकारने करून दाखविली आहे. ज्यांना कामच करायचे नाही ते वर्गवारी करीत जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री रात्री जाऊन मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करून जनतेची टिंगल करू लागले आहेत तर दुष्काळी परिस्थितीत बीडच्या पालकमंत्री विदेश दौरे करत आहेत.

राज्यात दुष्काळसदृश्य; बीडच्या पालकमंत्री अदृश्य अशी परिस्थिती झाल्याची खोचक टीका चव्हाण यांनी केली. तसेच, भाजप मंत्र्यांचे दुष्काळी दौरे दुष्काळासाठी नाहीत तर नवीन उमेदवारांच्या चाचपणीसाठी सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.