Home » महाराष्ट्र माझा » ना.मुंडेंनी घेतली रामराव महाराजांची भेट

ना.मुंडेंनी घेतली रामराव महाराजांची भेट

ना.मुंडेंनी घेतली रामराव महाराजांची भेट

डोंगरचा राजा / आँनलाईन

– प्रकृतीची केली आस्थेने विचारपूस.

मुंबई– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज लिलावती रूग्णालयात जावून महान तपस्वी रामराव महाराज यांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

बंजारा समाजाचे गुरू पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे महान तपस्वी रामराव महाराज सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रूग्णालयात उपचार घेत आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी आज लिलावती रूग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्यावर उपचार करणा-या डाॅक्टरांकडून त्यांनी तब्यतेची माहिती घेतली. ‘प्रकृतीची काळजी घ्या, तुम्ही लवकर बरे व्हाल’ असे त्या यावेळी म्हणाल्या. तब्येत बरी नसतांना देखील रामराव महाराजांनी यावेळी सावरगांव घाट येथे झालेल्या मेळाव्याची आठवण ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी बोलतांना काढली.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.