Home » ब्रेकिंग न्यूज » एकही तालुका वगळणार नाहीत – आ.धस

एकही तालुका वगळणार नाहीत – आ.धस

एकही तालुका वगळणार नाहीत – आ.धस

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड उस्मानाबाद लातुर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ एकही तालुका वगळला जाणार नाही : आ सुरेश धस

मुंबई — मराठवाड्यातील अनेक भागात पाऊसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली याची शासनाने दखल घेत प्रशासकीय अहवालानुसार काही तालुक्याचां गंभीर स्वरुपाची व काही तालुक्यांचा मध्यम स्वरूपाची यादी प्रसिद्ध केली यामध्ये तीनही जिल्ह्यात भयानक दुष्काळ असल्याने काही तालुक्यांचा मध्यम स्वरूपाचा उल्लेख झालेला त्याही तालुक्याचा गंभीर स्वरुपात समावेश करण्यात येईल या बाबतीत ना पंकजाताई मुंडे याच्यां समवेत ना चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कडे पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती आ सुरेश धस यांनी दिली

राज्यात भयानक दुष्काळदृष्य परस्तिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना महाराष्ट्र शासन संवेदनशील पणे हि परिस्थिती हातळत आहे प्रशासकीय यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले तसेच प्रशासनाने दुसरी कळ नुसार काही तालुक्यांचा गंभीर स्वरुपाची व काही तालुक्यांचा मध्यम स्वरूपाचा समावेश केला यामध्ये अनेक तालुके मध्यम स्वरूपाचे जाहिर झाल्याने नागरिकांत गैरसमज निर्माण झाला आहे त्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री ना चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सर्व यंत्रणेला वेळो वेळी संपर्क साधून टच मध्ये आहेत शेतकरी रोजगार नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ना चंद्रकांत पाटील यांना ना पंकजाताई मुंडे यांच्या समवेत भेटून गंभीर स्वरूपात करण्यात येईल असा विश्वास आ सुरेश धस यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.