Home » माझा बीड जिल्हा » देशमुखांचा आ.धस यांच्या हस्ते सन्मान.

देशमुखांचा आ.धस यांच्या हस्ते सन्मान.

देशमुखांचा आ.धस यांच्या हस्ते सन्मान.

अमोल जोशी /डोंगरचा राजा

पाटोदा येथे रेणुका माता मंदिर येथे राष्ट्रपुरूष मल्हारराव होळकर सामाजिक प्रतिष्ठान पाटोदा यांच्या वतीने थोर इतिहास संशोधक श्री गोपाळराव देशमुख यांचा सत्कार आ. सुरेश अण्णा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विजयभाऊ गोल्हार जि. प. शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख गणेश नारायणकर नायब तहसीलदार गणेश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती श्री गोपाळराव देशमुख यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपुरूष मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा उजाळा देऊन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मुद्द्यांचे विश्लेषण केले. तसेच शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगताना म्हणाले कि जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडवतो तेव्हा आज विचारवंतांच्या बरोबरच विध्यार्थी यांनी सुध्दा थोर महापुरुषाचा इतिहास वाचला पाहिजे. त्यासाठी जि. प. शाळेत संदर्भ पुस्तक प्रत उपलब्ध करण्याचा सुचना जिल्हा परिषद वतीने करण्यात येईल.
अध्यक्षीय भाषणात आ. सुरेश अण्णा धस यांनी सांगितले की सुभेदार मल्हारराव होळकर हेच खरे मराठा साम्राज्याचे अढळ स्थान होते तेच खरे मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ होते. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राजकीय निर्णयामुळे ते मराठा साम्राज्यातील राष्ट्रपुरूष ठरले.
यावेळी जि. प. सदस्य प्रकाशदादा कवठेकर, माऊली जरांगे, बबन सोनवणे, प. सदस्य,महेंद्र नागरगोजे, देविदास शेंडगे, माजी सभापती आनंद जाधव, केशव रसाळ गटशिक्षणाधिकारी गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण, बालाजी जाधव, राजु जाधव, जाधव एल आर, अँड जब्बारभाई पठाण, नगरसेवक अमोल दिक्षित, शरद बामदळे, अँड सुशिल कवठेकर, विजय जोशी, संदिप जाधव, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मानेसर, प्रा गाडेकर सर, डॉ नंदकुमार जाधव, शिवव्याख्याते अशोक बांगर, सुधीर घुमरे, नारायण भोंडवे रामदास भोंडवे सुदर्शन काळे पत्रकार विजय जाधव, संजय सानप, बबन उकांडे शेख अजिज हे उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगद भोंडवे, सुनील काळे, हरिदास काळे, बलभीम देवकते, बाळासाहेब मुसळेसर, विष्णु काळे, संदीपान रानमारे, रामदास निंगुळेसर, अविनाश गिरे, बापुराव डफाळ मोहन सुसलादे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण नजानसर यांनी केले तर या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन श्री पंढरीनाथ सोंडगे सरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.