मोदी महाराष्ट्राच्या पाठिशी उभे – फडणवीस
डोंगरचा राजा / आँनलाईन..
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी मोदी शिर्डीमध्ये आले आहेत.
मोदी दुष्काळात महाराष्ट्राच्या पाठिशी उभे रहातील हा विश्वास आहे – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
– साईबाबांच्या नगरीत मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो.
– शिर्डी धार्मिक पर्यटनाचे शहर.
– शिर्डी धार्मिक पर्यटनाचे शहर.
– साडेचार लाख घरकुलांच बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार.
– मोदी तुमचे २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचे स्वप्न आम्ही २०१९मध्येच पूर्ण करु
– नरेंद्र मोदी आणखी सहा लाख घरांची आवश्यकता
– २०१ तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.
– महाराष्ट्रत दुष्काळाची शक्यता
– ७१ टक्के फक्त पाऊस झाला आहे.
– केंद्र सरकार दुष्काळात आमच्या पाठिशी उभी राहिल असा विश्वास.
– गरीबांच्या योजनेत परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही ज्या योजना आणल्या त्या सर्व योजना महाराष्ट्र पूर्ण करेल.
जवळपास २० हजार लाभार्थ्यांना या कार्यक्रमातच घरांचे वाटप करण्यात येणार आहे. शिर्डीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मोदी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जातील त्यावेळी सर्वसामान्या भक्तांनाही दर्शन घेता येईल.