Home » देश-विदेश » मोदींनी केले ना.पंकजा मुंडेंचं कौतुक

मोदींनी केले ना.पंकजा मुंडेंचं कौतुक

मोदींनी केले ना.पंकजाताईं मुंडेंचं कौतुक

डोंगरचा राजा / आँनलाईन

— पंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास.

— पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
ना.पंकजाताई मुंडेंच्या कामाचे कौतुक.

अहमदनगर दि. १९ —- ‘ पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी आज शिर्डी येथे आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील वीस हजाराहून अधिक पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात आल्या. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबागेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरत असतानाचा हा प्रसंग आहे. ग्रामविकास विभागाने कार्यक्रमाचे केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून ते खूश झाले, पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून ना. पंकजाताई मुंडे यांना बोलावून घेतले आणि ‘ पंकजा तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग राज्य में बहोत अच्छा काम कर रहा है, आगे बढो ‘ अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी शिर्डी विमानतळावर ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.