Home » विशेष लेख » किर्तनातुन घडते समाज प्रबोधन — रामदासी

किर्तनातुन घडते समाज प्रबोधन — रामदासी

किर्तनातुन घडते समाज प्रबोधन — रामदासी

डोंगरचा राजा / आँनलाईन

*ह.भ.प. भरतबुवा रामदासी हे महाराष्ट्रातील नामवंत राष्ट्रीय* *कीर्तनकार आहेत. त्यांनी आतापर्यंत 40 वर्षांच्या काळात* *जवळपास 11 हजारांहून अधिक कीर्तने केली. वर्तमान* *काळातील ज्वलंत सामाजिक प्रश्नावर ते कीर्तनांतून* *सातत्याने प्रबोधन करतात. सध्या मराठवाड्यात शेतकरी* *आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. या गंभीर प्रश्नावर* *ह.भ.प.राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी कीर्तनाच्या* *शेवटी 15 मिनीटे प्रभावी प्रबोधन करतात. यांतूनच* *एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबली व त्याला* *जगण्याची प्रेरणा मिळाली तरी माझे कीर्तन सार्थकी लागले* *असे मी समजेल, असे ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा* *रामदासी म्हणतात. मानवाचा जन्म दुर्लभ आहे. पाप* *पुण्याचे पारडे समसमान होते, त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त* *होतो.*

_प.पू. पारनेरकर महाराज म्हणाले -_
*जगावे जगावे नेटाने जगावे.. मरावे मरावे हितालागी..!*

_संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -_
*आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करु नाश आयुष्याचा..!*

*ही संतवचने माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. जगतांना* *सत्कर्म करण्याचा उपदेश करतात. आज शेतकरी*
*कर्जबाजारी होतो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी* *सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकाने*
*नष्ट करतो. खरं तर, अध्यात्म शास्त्रात असं सांगितलं आहे* की –

*आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. या पापातून मुक्त होता* *येत नाही. तो अतृप्त आत्मा त्याच देहात भरकटत राहतो.* *त्याला गती नाही. आपण मात्र अविचाराने हे पाप करत* *असतो. एक माणूस सोडून दिला तर, कुठलाही प्राणी*
*कधीच आत्महत्या करीत नाही. वादळी वारे येते, कधी जल* *प्रलय होतो, अशा आपत्तीत कोणता प्राणी जीवन* *संपवतो..?*

*घरटे उडते वादळात.. वारुळात पाणी शिरते..!*
*कोणती मुंगी, कोणते पाखरु सांगा आत्महत्या करते..?* *निर्धाराने जिंकू आपण.. पुन्हा यशाचा गड..!*
*आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ..!*

*असा उपदेश ते कीर्तनांतून सातत्याने शेतकरी वर्गाला*
*करतात. श्रोते हे ऐकून भावविभोर होतात. सज्जनहो..!*
*कुणीही आत्महत्या करू नका. हा सोन्यापेक्षाही मूल्यवान* *असणारा मनुष्य देह अविवेकाने नष्ट करू नका. हा देह* *परत मिळणार नाही. आलेले दिवस निघून जातील, धरणी* *माता परत पिकेल, फुलेल पण गेलेला देह पुन्हा मिळेल* *का…? त्यामुळे विवेकाने जगा…!*

_समर्थ रामदास स्वामी म्हणतात -_
*जीवनाचे सार विवेक विचार. दुजा आविष्कार नाही काही.!*

*संतांनी आम्हाला आनंदाने जगण्याचा मूलमंत्र शिकवला.*

*निर्धाराच्या वाटेवर.. टाक निर्भीडपणे पाय..!*
*तू फक्त विश्वास ठेव.. पुन्हा फुलेल धरणी माय..!*

*अशा प्रकारे निरुपण करीत, ह.भ.प. भरतबुवा रामदासी* *श्रोत्यांना अंतर्मुख करतात. कीर्तन तर आपण नेहमीच* *ऐकतो पण सामाजिक प्रश्नांचे भान ठेवून कीर्तन करणारे* *भरतबुवांसारखे कीर्तनकार अभावानेच असतात. ह.भ.प.* *राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांना महाराष्ट्रातील* *अनेक मान्यवर सामाजिक संस्थांकडून आतापर्यंत अनेक* *राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या नेहमीच्या* *कीर्तनानंतर ते 15 मिनीटे तरी सामाजिक प्रश्नांवर*
*तळमळीने बोलतात. शेतकरी आत्महत्या, पाणी अडवा* *पाणी जिरवा, व्यसनमुक्त जीवन हे विषय ते आवर्जून* *बोलतात.* *कीर्तना साठी एखाद्या गावात गेल्या नंतर हभप भरतबुवा चटई कीर्तनाचा उपक्रम राबवितात.* *गावातील चौकात किंवा गल्लीत एक चटई अंथरून नुसत्या टाळावर सामाजिक विषय प्रतिपादन करतात.* *या कीर्तनाचा देखील चांगला परिणाम घडतो. खरं तर कीर्तन हे एक समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.* *यात अध्यात्मिक मूल्यांबरोबरच, सामाजिक मूल्यांचे प्रबोधन संत विचारातून सहजपणे करता येते.* *भरतबुवा गेली अनेक वर्षे हे कार्य सातत्याने करीत आहेत.*

Leave a Reply

Your email address will not be published.