Home » माझी वडवणी » सर्वपक्षीय, वडवणीकरांचा नगरपंचायतवर मोर्चा

सर्वपक्षीय, वडवणीकरांचा नगरपंचायतवर मोर्चा

सर्वपक्षीय, वडवणीकरांचा नगरपंचायतवर मोर्चा

डोंगरचा राजा / ऑनलाइन

वडवणी येथील नागरिकांचा व सर्वपक्षीय मान्यवरांचा वडवणी नगरपंचायत व मंगळवार रोजी भव्‍य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मोर्चेकरांनी केले आहे.

वडवणी नगरपंचायत कार्यालयावर दिनांक 16/ 10 /2018 रोजी मंगळवार या दिवशी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वडवणी नगरपंचायत अमलात येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला.वडवणी नगरपंचायतला करोडो रुपयांचा निधी आला. या निधीचे योग्य प्रकारे विनियोग झालेला नाही. तसेच वडवणी शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. करिता सर्वपक्षीय व शहरवासीयांच्या वतीने विविध मागण्या साठी वडवणी नगरपंचायत वर भव्य मोर्चाचे आयोजन आले आहे. या मोर्चात तमाम नागरिकांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये वडवणी शहरातील विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये वडवणीकरांना हिरव्या पाण्यापासून मुक्त करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची चौकशी करण्यात यावी, नगरपंचायतीने खरेदी केलेल्या कचरा कुंड्या उपलब्ध नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कचराकुंड्याची चौकशी करण्यात यावी, वार्ड क्रमांक बारा-तेरा व सोळा मधील अंडरग्राउंड नालीची चौकशी करण्यात यावी, वडवणी गावठाणांची हद्दवाढ करण्यात यावी, नवीन व्यापारी संकुलन मधील गाळे पारदर्शक पद्धतीने शासन निर्णयाप्रमाणे स्थानिकांना जाहिरात देऊन वाटप करावे, बोगस पिटीआरची याची चौकशी करण्यात यावी, वडवणी येथील बीड परळी मुख्य रस्त्यावरील विद्युत पोलच्या झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, नवीन पाणीपुरवठा योजना लवकर कार्यान्वीत करावी, वडवणी नगरपंचायतची आम्ही / ग्रामसभा घेण्यात यावी. यासह आदी महत्त्वपूर्ण मागण्यासंदर्भात सर्वपक्षीयांच्या वतीने व वडवणी शहरातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वरूपात दिनांक 16/ 10 /2018 रोजी मंगळवार या दिवशी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील राम मंदिर मार्ग ते नगरपंचायत कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. तरी तमाम नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विठ्ठल भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीराम मुंडे, शिवसेना शहर प्रमुख नागेश डीगे,रिपाईचे तालुका अध्यक्ष महादेव उजगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार, रिपाइंचे शहराध्यक्ष प्रकाश तांगडे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख प्रमिलाताई माळी, युवक शहर प्रमुख हनुमंत शिंदे , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवानेते सतीश मुजमुले , भालेराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष शारदाताई उजगरे , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश उजगरे सह आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.