Home » माझा बीड जिल्हा » जिल्हाप्रमुख मुळुक, जाधव यांचा पाठपुरावा..

जिल्हाप्रमुख मुळुक, जाधव यांचा पाठपुरावा..

जिल्हाप्रमुख मुळुक, जाधव यांचा पाठपुरावा..

डोंगरचा राजा / आँनलाईन

◾शिवसेनेच्या आंदोलना मुळे प्रशासन झुकले… शेतकर्यांना मिळाला न्याय

– शिवसेना प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची यशस्वी शिष्टाई; 18ऑक्टोबर पर्यंत ऊस बीले देण्याची हमी.

बीड- ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना(पवारवाडी ,ता.माजलगाव, जि.बीड) प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक व माजलगाव चे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर पिडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ‘झोपडी निवास आंदोलना’ला मोठे यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित 150 शेतकऱ्यांना आजच्या आज तात्काळ ऊसाचे पैसे खात्यात जमा करुन येत्या 18 ऑक्टोबरला पूर्ण थकित रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने आज दिनांक 12ऑक्टोबर शुक्रवार रोजी दिली. दरम्यान शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य शिष्टाई केली आणि पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

अनेक महिने या पिडीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली सरकारी दरबारी थेटे घालून या प्रश्नी पाठपुरावा केला तरीही कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने माजलगाव तालुक्यातील या पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला त्यानूसार आंदोलनाची दिशा ठरवुन आंदोलन उभे केले

शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, यांनी यशस्वी शिष्टाई केल्या बद्दल बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अप्पासाहेब जाधव यांनी आभार मानले. या शिष्टमंडळात राजश्री जाधव, सिता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मच्छिंद्र शिंदे, गोविंद शेंडगे आदींची उपस्थिती होती. तसेच या आंदोलनात संजय महाद्वार, सुशिल पिंगळे, रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, दासु बादाडे, संदीप माने, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, लक्ष्मण सोळंके, रामदास ढगे, फारुक सय्यद, महादेव लंगडे, रामेश्वर काशिद, कचरु बढे, बळीराम भले, राहुल कोल्हे, ज्ञानेश्वर खराडे, विजय नाईकनवरे हे शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले होते.
◾◾◾◾

Leave a Reply

Your email address will not be published.