Home » माझा बीड जिल्हा » सिलेंडरने लागलेल्या आगीत घर भस्मसात.

सिलेंडरने लागलेल्या आगीत घर भस्मसात.

सिलेंडरने लागलेल्या आगीत घर भस्मसात.

रविकांत उघडे /डोंगरचा राजा आँनलाईन

– नागरिकांत भीतीचे वातावरण.

माजलगाव — शहरापासून हाकेच्या अंतरावर देवखेडा गावातील शेख जावेद शेख दिलावर यांच्या घराला दी.6 रोजी रात्री 9 वाजता गॅस गळतीमुळे आग लागली घरातील 80 हजाराच्या नोटा व गादीमध्ये ठेवलेले 60 हजार रुपये, फ्रिज कुलर इन्वर्टर, लॅपटॉप प्रिंटर, मशीन व संसारोपयोगी साहित्य यासह असे पाच ते सात लाखांचे नुकसान झाले असल्याचे शेख जावेद यांनी सांगितले.
यात धक्कादायक असे की ही गळती
रेगुलेटर किंव्हा पाइप मध्ये झाली नसून सिलेंडरचा वरच्या भागात असलेली वेल्डिंग पासून सिलेंडर लीक झाला.व मोठ्या प्रमाणत गॅस बाहेर पडून आग लागली .व काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले व सगळे घर यात जळून खाक झाले.
आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाचे जवान सतीश शिरसागर ,अनिल भिसे ,समीर शेख, हे अग्निशामक ची गाडी घेऊन आले व घराला लागलेली आग अग्निशामक दलाचे जवान व देवखेडा गावातील नागरिकांनी आग एक तासाच्या आत आटोक्यात आणली या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. परंतु सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने या आगीत जीवित हानी झाली नाही.
शहराजवलील घडलेल्या सिलिंडर भडक्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तांत्रिक सदोषता, नियमित तपासणीचा अभाव आणि ग्राहकांना अपुरे मार्गदर्शन यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गॅस वितरकांकडूनच ग्राहकांच्या सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती प्रक्रिया राबविली जात नसून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जिल्हा प्रशासनची पकड सैल झाल्याची नागरिकात चर्चा होताना दिसत आहे. तालुक्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा गॅस वितरक आहे. ते हजारो ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवितात. गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या वितरकांची असते. त्यांचे हे काम त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्याची ची असते. ग्राहकांच्या घरापर्यंत गॅस सिलिंडर पोहोचविल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने त्या सिलिंडरचे वजन, गॅस लिकेज तपासून घेणे आवश्यक आहे. सर्व गोष्टींची अचूक खातरजमा झाल्यानंतर सिलिंडर शेगडीला जोडून देणे, शेगडीची ज्योत व्यवस्थित पेटते आहे किंवा नाही, हे तपासून बघणे बंधनकारक आहे. मात्र, यापैकी एकही बाब वितरक किंव्हा त्यांचे कर्मचारी पाहिंजे तेवढ्या गंभीरपणे करीत नाहीत. ग्राहकांना मार्गदर्शनदेखील केले जात नाही.अशी ग्राहकाकडून बोलले जात आहे. वितरकांनी सिलिंडरच्या सुरक्षेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन केले जाते की नाही याकडे महसूल विभागाने काटेकोपणे लक्ष पुरविले जावे. अशी गॅस ग्राहकातून मागणी होत आहे.
सदरील घटनेचा प्रशासन कडून पंचनामा करण्यात आला आहे.तसेच सबंधित गॅस वितरक याने पण घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.