Home » माझा बीड जिल्हा » धारूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..

धारूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..

धारूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

किल्ले धारूर दि.५ ( प्रतिनिधी )
धारूर तालुक्यात सन २०१८ च्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प झालेले असून पीकं अर्ध्यावरती करपून गेलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.असे असताना निजामकालीन आणेवारी मोजमाप पध्दतीने धारूर तालुक्यातील पिकांची आणेवारी / पैसेवारी ५६ आलेली आहे. हा धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांवरील घोर अन्याय आहे. निसर्गा मारले आहे आता चुकीचा सर्वे करुन शासनाचे अधिकारी ही मारत आहेत. तरी दि. २१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत नवीन मोजमाप पद्धतीने सुधारीत आणेवारी घोषीत करुन धारुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अन्यथा माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ : ३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धारूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. धारूर व तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जनावरांसहीत रस्ता रोको अंदोलन करण्यात येईल.असा इशारा तहसिलदार धारूर यांना दि.५आक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. धारूर च्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे,जेष्ठ नेते सुदर्शन आण्णा सोळंके, विठ्ठल दादा लगड, राम माने, उपाध्यक्ष बाबुराव गडदे, सरचिटणीस रतन शेंडगे, ता.युवकाध्यक्ष सटवा अंडील, किसान सेलचे विवेकानंद आदमाने, सरपंच संघटनेचे अध्यक्ष शेषेराव गडदे, अनिल सोळंके, राजाभाऊ सोळंके,गोविंद शिंदे,
रावसाहेब खुळे,बालासाहेबमायकर,राहूल चव्हाण,भागवत शिनगारे,विष्णू सोळंके,
कॉ.मधूकर चव्हाण, सुनिल सोळंके,सनी शिनगारे, आप्पासाहेब काकडे यांच्यासह बहुसंख्येने शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.