Home » Uncategorized » कुस्ती स्पर्धेसाठी कु.स्नेहा कसबे सज्ज..

कुस्ती स्पर्धेसाठी कु.स्नेहा कसबे सज्ज..

कुस्ती स्पर्धेसाठी कु.स्नेहा कसबे सज्ज..

डोंगरचा राजा / आँनलाईन

लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.स्नेहा संजय कसबे हिने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत, पहिला क्रमांक पटकावला. औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी ती आता सज्ज झाली आहे.
लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असणारी कु.स्नेहा कसबे हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत आष्टी येथील महिला कुस्तीपटुला हरवून महिलांच्या मॅटवरील स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. स्नेहा ही वयाच्या 10 व्या वर्षापासूनच कुस्तीचे धडे घेत आहे, सध्या तिचे प्रशिक्षण पुणे येथे सुरू आहे .
स्नेहा हिला बालवयापासूनच कुस्तीची आवड आहे. तिचे वडील संजय कसबे हे बीड जिल्ह्यातील नामांकित पहिलवान आहेत .त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांच्या मुलीने पूर्ण करावे असे त्यांना वाटते .संजय कसबे यांनी परिस्थितीवर मात करत डोंगरपट्ट्यातील आपली मुलगी स्नेहाला कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ते ठाम राहिले, आपली मुलगी स्नेहाने कुस्तीमध्ये नाव कमवावे , जसे गीता फोगाट व बबीता फोगाट यांनी कुस्तीमध्ये नाव कमवून आपल्या वडिलांची मान उंच केली ,तसेच स्नेहाने आपले नाव कमावून आपली मान उंच करावी अशी अपेक्षा तिचे वडील संजय कसबे यांनी व्यक्त केली.स्नेहा कसबे हिने शालेय जीवनात अनेक कुस्तीस्पर्धेत भाग घेतला, अनेक मानाची पदकही पटकावली ,कुस्तीतील अनेक डावपेचाची तिला माहिती आहे .
वडवणी सारख्या डोंगरपट्ट्यात स्नेहा ही महिला कुस्तीपटू तयार होत आहे, मुलगा मुलगी एक समान, मुला मुलीत भेद न करता ,संजय कसबे ने मुलीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले.त्या बद्दल मा.पंजाबराव मस्के यांनी संजय कसबे व स्नेहाचे अभिनंदन केले. स्नेहा ही वडवणी तालुक्याचे आणि बीड जिल्ह्याचे मानाचे पान ठरावे. आणि तिने कुस्तीची अनेक बक्षीस पटकावून महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवावे आशी अपेक्षा प्राचार्य डॉ.के.एम पवार त्यांनी व्यक्त केली .
स्नेहा हिने उस्ताद विजय भराटे यांच्याकडे कुस्तीतील डावपेचाचे धडे घेतले आहेत. ती रोज सकाळी सतत तीन तास व संध्याकाळी तीन तास व्यायाम करून आपला कुस्तीचा सराव करते. स्नेहा ही वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण या गावची रहिवासी आहे .अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिचे वडील संजय कसबे तिची व तिचा भाऊ वैभव कसबे, यांना पुण्यातील नामांकित कोच विजय भराटे यांच्याकडे प्रशिक्षणासाठी ठेवून प्रशिक्षण देत आहेत ,संजय कसबे यांच्याशी बोलताना ते असे म्हणाले की स्नेहाला खुराकासाठी प्रत्येक दिवशी पाचशे रुपये लागतात. ते पैसे पुरवण्याची परिस्थिती माझी नाही , मी एक साधा शिपाई आहे,तरी मी माझ्या मुलीला कुस्तीसाठी पैसे पुरवत आहे. वडवणी तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी ,कुस्ती प्रेमींनी, पुढे येऊन स्नेहल ला कुस्तीसाठी आर्थिक मदत करावी अशी आवाहन त्यांनी केली .
स्नेहाने कुस्तीत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला या निमित्ताने लोकमान्य टिळक महाविद्यालयात तीचा सत्कार करण्यात आला .या वेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. पंजाबराव मस्के, कार्यवाह अमरसिंह मस्के ,प्राचार्य डॉ. के.एम.पवार महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. राजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.गोपीचंद घायातीडक ,प्रा.जी.के.घोडेराव ,प्रा. गोपाळ मस्के, प्रा.नागनाथ साळुंके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.