खरवंडी कासारचा मेळावा यशस्वी करा -आंधळे
डोंगरचा राजा / आँनलाईन
— आ.सौ.राजळे यांनी केले मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन.
ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यासंदर्भात असणा-या संपाची सुरुवात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातून झाली.नंतरच्या काळातही त्याला खंबीर साथ आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची मिळाली. ऊसतोड मजूर मुकादम आणि वाहतूकदारांच्या विविध मागण्यासंदर्भात खरवंडी कासार येथे ऊस तोड कामगारांचा मेळावा होत असुन हा मेळावा यशस्वी करा असे आवाहन गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले. तर राज्यव्यापी मेळाव्यात सर्व मुकादमांनी वाहतूकदारांनी व ऊस तोड मजुरांनी सहभागी व्हावे.असे आवाहन आमदार सौ.मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.
पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार सौ.मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठक घेण्यात आली.यावेळी डॉक्टर मुत्यूंजय गर्जे,
नगराध्यक्ष पाथर्डी, दिनकर पालवे माजी नगराध्यक्ष ,सोमनाथ खेडकर प स सभापती, माणिक खेडेकर तालुका अध्यक्ष भाजपा, अशोक चोरमले,राहुल कारखेले, पिराजी कीर्तने ,संजय कीर्तने ,बाळासाहेब गोल्हार विनायक कीर्तने ,रुद्रा किर्तने, वामन कीर्तने सोमनाथ ढाकणे व तालुक्यातील ऊस तोड मुकादम आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार केशवराव आंधळे म्हणाले की,गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना पाथर्डी, शेवगावच्या वतीने 1 आॅक्टोंबर रोजी ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांना खंबीर साथ देत नामदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य ऊसतोड मजूर मेळावा घेण्यात येत असून राज्यभरातून ऊसतोड मजूर मुकदम शक्तीनिशी ऊतरून शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा योग आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्यात ऊसतोड मजुरांना भाव वाढ मिळाली पाहिजे, ऊसतोड मजुरांना विमा मिळाला पाहिजे, विम्याची रक्कम कारखान्याने भरावी, व त्यानुसार च्या सर्व सवलती ऊसतोड मजुरांना मिळाल्या पाहिजेत, वाहतूकदारांना भाव वाढ,मुकादमांना कमिशन या मागण्या मान्य करून घेण्याचा योग आला आहे. कारण राज्याच्या ग्रामविकास मंत्री बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची खंबीर साथ आपल्याला मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येत्या एक ऑक्टोंबरला हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात मुकदम व वाहतुकदारांनी शक्तीनिशी एक होऊन शक्तिप्रदर्शन दाखवून देण्यासाठी हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन ही माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले आहे. तर परिसरातील शेतकरी आणि ऊस तोड कामगारांनी या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सौ.मोनीकाताई राजळे यांनी केले आहे.