Home » माझी वडवणी » आंदोलनात सहभागी व्हा – नरेंद्र राठोड

आंदोलनात सहभागी व्हा – नरेंद्र राठोड

आंदोलनात सहभागी व्हा – नरेंद्र राठोड

डोंगरचा राजा/ आँनलाईन

हुमनी आळी मुळे नुकसान झालेल्या उसाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बीड परळी हायवे रोडवर असणाऱ्या कुप्पा फाट्यावर तीव्र स्वरूपात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या रस्ता रोको आंदोलनात तमाम शेतकरी बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे नरेंद्र राठोड यांनी केले आहे.
वडवणी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उसाचे हुमनी आळी मुळे नुकसान झाले आहे व आधीच अपुऱ्या पावसाअभावी कापूस, सोयाबीन, तूर ,भुईमूग ही खरीप पिके पूर्णपणे वाया गेलेले आहेत. शेतकऱ्यांना एकमेव आधार उसाचा आहे. तोही ऊस हुमणी आळी मुळे वाळू लागला आहे.अशा प्रकारच्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.या मागणीसाठी दिनांक 28/ 9/2018 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत शिवसेनेच्या वतीने संपर्क नेते चंद्रकांत खैरे,विश्वनाथ नेरूरकर, संपर्क प्रमुख सुधीर मोरे,विधानसभा प्रमुख सुनील विचारे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे नेते अनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना, किसान सेना, महिला आघाडी, व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात कुप्पा फाटा येथे बीड परळी हायवे रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या आंदोलनात हजारो शेतकरी बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन रस्ता रोको चे आयोजक, अध्यक्ष शिवसेनेचे नरेंद्र राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.