Home » महाराष्ट्र माझा » ना.पंकजाताई मुंडे व लवादाची बैठक..

ना.पंकजाताई मुंडे व लवादाची बैठक..

ना.पंकजाताई मुंडे व लवादाची बैठक..

डोंगरचा राजा आँनलाईन

– ना.ताईंच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांची घेतली भेट.

– पाठपुरावा सुरुच ठेवणार- माजी आ.आंधळे

– कोयता बंद ठेवण्याचा संघटनांचा निर्धार !

मुंबई दि. २२ — राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या सध्या सुरू असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या तथा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्यात असलेल्या लवादाची बैठक आज पार पडली. ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांनी बैठकीत आग्रही भूमिका मांडून यावेळी सविस्तर चर्चा केली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे यांनी आपण सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या मान्य होईपर्यंत पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत कोयता बंदच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनानी घेतला आहे.

ऊस तोडणी व वाहतूक दरात शंभर टक्के वाढ करावी, मुकादमांना ३५ टक्के कमिशन द्यावे, कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे हप्ते राज्य सरकार व साखर कारखान्याने संयुक्तपणे भरावे, मजूरांना तसेच त्यांच्या जनावरांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, मजूरांना पक्की घरे, शुध्द पाणी व शौचालयाची सुविधा द्यावी, ऊस तोडणा-या गरोदर महिला मजूरांना आर्थिक मदतीसह अन्य सुविधा द्याव्यात या व इतर मागण्यांसाठी राज्यातील ऊसतोड कामगार सध्या संपावर आहेत.

ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ना. पंकजाताई मुंडे व आमदार जयंत पाटील यांच्यात आज साखर संघाच्या सभागृहात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगांवकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच ऊसतोड संघटनांचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते. ऊसतोड मजूरांच्या मागण्या रास्त असून त्यावर प्राधान्याने तोडगा निघावा यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली. ऊसतोड दर वाढीबाबत पूर्वी तीन वर्षाचा करार होता, आता तो पांच वर्षाचा करण्यात आला आहे, असा करार आतापर्यंत झाला नव्हता. हया करारानुसार दर वाढ देण्याबाबत तसेच संघटनेने बैठकीत मांडलेल्या विविध मागण्यांविषयी त्यांनी लवादात सारासार चर्चा केली. यावेळी ऊसतोड संघटनेच्या वतीने उपस्थित प्रतिनिधींनी कामगारांचे विविध प्रश्न आणि दरवाढीवर भूमिका मांडली.

— ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दसरा अगोदर महामंडळ कार्यान्वित करु असे आश्वासन दिल्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोड मजुर महामंडळ स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
——

*तोपर्यंत कोयता बंदच राहणार*
—————————
दरम्यान, ऊसतोड मजूरांच्या मागण्यांविषयी लवादाच्या बैठकीत चर्चा झाली असली तरी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा निर्णय ऊसतोड कामगारांच्या संघटनानी घेतला आहे. लवादाच्या बैठकीत यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे, गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, रामकृष्ण घुले, जीवन राठोड, आबासाहेब चौगुले, राणा डोईफोडे, रामहरी दराडे, महादेव बडे, संजय तिडके, सुखदेव सानप, सुरेश वनवे, विष्णूपंत जायभाये, तात्यासाहेब हुले, सुधाकर लांब, तुकाराम तिडके, अशोक बडे,गहीनीनाथ थोटे, देवीदास तोंडे, जयदेव तिडके सह आदींसह विविध ऊसतोड मजूरांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.