Home » महाराष्ट्र माझा » कायदा सरकारने प्रलंबित ठेवला ना.मुंडे

कायदा सरकारने प्रलंबित ठेवला ना.मुंडे

कायदा सरकारने प्रलंबित ठेवला ना.मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

*कोणत्याही सरकारला मिडीयाचा आवाज दाबता येणार नाही-समीरण वाळवेकर*

*सरकारने पत्रकारांची अवस्था शेतकर्‍यां सारखी केली-एस.एम.देशमुख*

*_मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचा शानदार समारोप_*
—————————–
अंबाजोगाई (प्रतिनिधी) पत्रकार संरक्षण कायदा करण्याविषयी सरकार टाळाटाळ करीत आहे. सरकारची भूमिका व निती बदलल्याचे दिसत आहे.मुळात सरकारला हा कायदाच नको असल्याने तो प्रलंबित ठेवला आहे. मिडीयाची मदत घेवून सरकार सत्तेवर आले.पण,या सरकारला आज मिडीयाचाच विसर पडला आहे.मिडीयावर बंधने आणली जात आहेत. तसेच राज्यातील वाढती महागाई,पेट्रोल दरवाढ या बाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थतीकडे अधिवेशनात लक्ष वेधले.तर यावेळी बोलताना ज्येष्ठ माध्यम तज्ञ समीरण वाळवेकर यांनी सध्या तीन दशकानंतर मिडीयाची अवस्था वाईट झाल्याचे सांगुन मिडीया ही व्यवस्थाच संपावयाची आहे.गोबेल्सचे तंत्र वापरून सरकार निरंकुश राज्य राबवित आहे.तेंव्हा आशा काळात धोक्याची घंटा ओळखून माध्यमात काम करणार्‍या प्रत्येकाने डोळस पत्रकारिता करून सरकारचा सक्षमपणे विरोध केला पाहिजे असे आवाहन वाळवेकर यांनी केले तर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी सरकारच्या प्रसार माध्यमाविषयीच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करून पुढील काळात संघटीत होवून लढा देण्याचे आवाहन केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गुरूवार,दि. 20 सप्टेंबर रोजी येथील एम.आय.टी.संचलीत श्री.सरस्वती पब्लिक स्कुल नागझरी (शेपवाडी) येथे पहिल्या बीड जिल्हास्तरीय अधिवेशन व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन ना. धनंजय मुंडे ( विरोधी पक्षनेते विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी समीरन वाळवेकर (जेष्ठ माध्यम तज्ञ व सुप्रसिद्ध वृत्त निवेदक),यशवंत भंडारे (माहिती संचालक, महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (मराठवाडा विभाग, औरंगाबाद) ,एस.एम देशमुख (विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद) यांच्या सह याप्रसंगी आ.संगीताताई ठोंबरे,माजी मंञी प्रकाशदादा सोळंके, शरद पाबळे (कोषाध्यक्ष,मराठी पत्रकार परिषद),
राजेसाहेब देशमुख (शिक्षण सभापती जी प बीड),राजेश कराड (समन्वयक,एम.आय.टी संचलित,सरस्वती पब्लिक स्कुल, अंबाजोगाई),रमेशराव आडसकर (चेअरमन, आंबसाखर),पृथ्वीराज साठे (आमदार,केज), नंदकिशोर मुंदडा (जेष्ठ नेते),बजरंग सोनवणे (अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस बीड),बन्सीधर सिरसाट(चेअरमन,बीड जिल्हा सह.मजूर संस्थाचा सहकारी संघ),
अनिल महाजन (सरचिटणीस,मराठी पत्रकार परिषद),
सारंग पुजारी (उपनगराध्यक्ष, अंबाजोगाई न.प),
प्रा.एस.पी. कुलकर्णी (छत्रसेना प्रमुख, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई),जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी “स्व.सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार” मुंबई येथील पी.टी.आयचे निवासी संपादक विलास तोकले यांना,“स्व.बाबुरावजी आडसकर स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्कार” दै,सुराज्यचे सर्वोत्तम गावरस्कर यांना “स्व.प्रभाकरराव कुलकर्णी स्मरणार्थ श्रमिक पत्रकारिता पुरस्कार” दै.चंपावतीपत्र,बीडचे उपसंपादक दगडू पुरी यांना मराठी पत्रकार परिषद बीडच्या वतीने देण्यात येणारा स्व भास्कर चोपडे समरणार्थ युवा पत्रकारिता पुरस्कार दै. दिव्यमराठी बीड चे उपसंपादक रवी उबाळे यांना देवून सन्मानित करण्यात आले.पुढील वर्षीपासून दिवंगत माजी मंञी विमलताई मुंदडा यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याचे संयोजकांनी जाहीर केले.यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर यांनी मराठी पत्रकार परिषदेचे कार्य, भूमिका व आधिवेशन आयोजनाबाबतची माहिती दिली.तर स्वागताध्यक्ष राजकिशोर मोदी आजच्या पत्रकारिते समोर मोठी आव्हाने असल्याचे सांगुन काँग्रेसच्या कार्यकाळात खुल्या वातावरणात पत्रकारिता करता येत होती.आज प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी होताना दिसते हे सांगुन पत्रकारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी नमुद केले.सत्काराला उत्तर देताना विलास तोकले यांनी तरूण पिढीतील संवाद आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी होत असल्याचे सांगुन नाकारात्मक पत्रकारितेला मिळत असलेल्या प्राधान्याबद्दल नापसंती व्यक्त करून एकेकाळी मिशन असणारी पत्रकारिता आज कमिशनपुर्ती समित झाल्याचे त्यांनी नमुद केले.यावेळी आ.संगीताताई ठोंबरे, माजी आ.पृथ्वीराज साठे,राजेसाहेब देशमुख,यशवंत भंडारे, रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा, अनिल महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना माध्यमतज्ञ यांनी स्पष्ट भूमिका घेणारे व टिका करणारे पत्रकार सरकारला नको आहेत. भांडवलदारांच्या हातात मिडीया जात आहे. आपल्याला हवे तेच लोकांना दाखवा असे धोरण सरकारचे असून पुढील काही दिवसात ग्रामिण भागातील 35 टक्के वर्तमानपत्रे बंद पडतील अशी भिती व्यक्त करून भूमिका घेवून पत्रकारीता करा, आव्हाने ओळखा, डोळस व्हा,तंत्रज्ञानाशी दोस्ती करा असे आवाहन वाळवेकर यांनी केले.उद्घाटक म्हणून बोलताना ना.धनंजय मुंडे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केेले.अतिशय चांगले अधिवेशन घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे कौतुक केले. माध्यमांविषयी सरकार उदासिन असल्याचे सांगुन चॅनल वरील चर्चासत्रात आपल्याला पाहिजे त्या विषयावर चर्चा होत नसेल तर जाहिराती बंद करू असा दबाव चॅनलवर असल्याचे त्यांनी सांगितले.2019 ला देशात कदाचित शेवटची निवडणूक होईल व त्यानंतर देशाची घटना बदलली जाईल अशी भिती व्यक्त करून जे सरकार जनतेच्या विरोधात त्यांच्या विरोधात आम्ही असे सांगुन बीड जिल्ह्यातील पत्रकारीतेला असणारा मोठा वारसा या विषयीची माहिती ना.मुंडे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातून दिली.परिवर्तनाच्या लढाईत प्रसार माध्यमांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करताना एस.एम. देशमुख यांनी पाठपुरावा करून ही पत्रकार कायदा विधेयक राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. वय वर्षे 60 पुर्ण झालेल्या व 30 वर्ष अनुभव असलेल्या पत्रकारांना पेन्शन मिळावी, अधिस्वीकृतीच्या नियमावलीत शितीलता आणावी.पत्रकारांना आरोग्य विषयक सोयी सुविधा,मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजुरीसाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेल्या भूमिकेला सहकार्य करण्याचे काम विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी केल्याचे देशमुख म्हणाले. जिल्हा पातळीवरचे उत्कृष्ठ अधिवेशन अंबाजोगाईत घेतल्याबद्दल त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई येथील संयोजन समितीचे अभिनंदन केले.प्रारंभी पञकार वसंतराव मुंडे यांच्या मातोश्री व पञकार संजय रानभरे यांच्या मातोश्री यांच्या दु:खद निधनाबद्दल सभागृहाने श्रध्दांजली अर्पण केली.
प्रतिमापुजन व दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.तर गायक सुभाष शेप व मयुरी गायकवाड यांच्या संगीत रजनीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमास संपादक नामदेवराव क्षीरसागर,संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, संपादक नरेंद्र कांकरीया,संपादक सुनिल क्षीरसागर, संपादक सतिष बियाणी,संपादक राजेंद्र होळकर,संपादक वैभव स्वामी,संपादक राजेंद्र अगवान,संपादक अभिमन्यु घरत, संपादक प्रकाश सुर्यकर,संपादक बालासाहेब कडबाने,
धैर्यशील सोळंके, गोविंदराव देशमुख, शंकरराव उबाळे, विलासराव सोनवणे, राम कुलकर्णी,उद्धवराव आपेगावकर,वसंतराव मोरे,महेश वाघमारे, जगदीश पिंगळे,कल्याण कुलकर्णी,कल्याण नेहरकर,बाळासाहेब मुकादम आदींसहीत मान्यवरांची उपस्थिती होती.अधिवेशनाला जिल्ह्यातून व उस्मानाबाद लातूर येथून ही पत्रकार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या नगरसेवक सतिष टोणगे,सुभाष नाकलगावकर यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परमेश्वर गित्ते व विरेंद्र गुप्ता यांनी केले तर उपस्थितांचे आभार गजानन मुडेगावकर यांनी मानले.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष राजकिशोर मोदी, राजेश कराड,सुभाष चौरे (जिल्हाध्यक्ष), दत्तात्रय अंबेकर (कार्याध्यक्ष),विलास डोळसे (बीड जिल्हासरचिटणीस), विशाल साळुंके (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), अनिल वाघमारे (सदस्य अधिस्वीकृती समिती) अशोक खाडे (जिल्हा निमञंक,हल्ला विरोधी कृती समिती) संतोष स्वामी (सोशल मिडिया प्रमुख),परमेश्वर गीते (जिल्हा सहसचिव ), प्रदीप तरकसे (जिल्हा सह संघटक),गजानन मुडेगावकर (निमंत्रक, हल्ला विरोधी कृती समिती),प्रकाश लखेरा (अध्यक्ष, अंबाजोगाई पत्रकार संघ),विरेंद्र गुप्ता (सचिव, अंबाजोगाई पत्रकार संघ),दत्तात्रय दमकोंडवार,दादासाहेब कसबे (अध्यक्ष, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ)गोविंद खरटमोल (सचिव अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ),सालम पठाण (अध्यक्ष आदर्श ग्रामिण पत्रकार संघ) यांच्यासहीत मराठी पत्रकार परिषदेच्या संयोजन समितीने पुढाकार घेतला.

*मान्यवरांची पत्रकार कल्याण निधीस सढळ हस्ते मदत..!*
—————————–
माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी स्व.सुंदरराव सोळंके माजलगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार कल्याण निधीसाठी पाच लाख एक हजार रूपये देत असल्याचे तर बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी 51 हजार रूपये देण्याचे जाहिर केले.ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांनी पुरस्काराची 21 हजार रूपये रक्कम व विलास तोकले यांनी पुरस्काराचे 21 हजार व स्वतःचे पाच हजार असे मिळवून 26 हजार रूपये पत्रकार कल्याण निधीसाठी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.