Home » ब्रेकिंग न्यूज » आमदाराची ‘नवरी’ पळाली..

आमदाराची ‘नवरी’ पळाली..

आमदाराची ‘नवरी’ पळाली..
डोंगरचा राजा / आँनलाईन
— आमदाराने विवाहाची तयारी केली होती. 
— मुलीच्या घरीही जय्यत तयारी  होती.
तामिळनाडू — घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना नवरी मुलगीच पळून गेल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. तामिळनाडू येथील भवानीसागर विधानसभा क्षेत्राचे आमदार एस ईश्वरन यांच्यासोबत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील निमंत्रणही देण्यात आलं होतं.
12 सप्टेंबर रोजी ईश्वरन यांचं लग्न ठरलं होतं. आमदाराने मोठ्या उत्साहाने विवाहाची तयारी केली होती. मुलीच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, अचानक नवरी मुलगीच पळून गेल्याची बातमी आली. तेव्हापासून परिसरात सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.
ईश्वरन यांचे वय ४३ वर्ष तर मुलीचे वय २३ वर्ष आहे. यामुळे ही मुलगी पळाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर तिचं दुसरं प्रेमप्रकरण सुरू होतं आणि आपल्या प्रियकरासोबत ती पळाली असल्याची शक्यताही येथे वर्तवली जात आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता बहिणीकडे जाते असे सांगून ही मुलगी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर तिचा फोन बंद होता. रात्र झाली तरीही मुलगी परतली नाही म्हणून बहिणीला फोन केला असता ती बहिणीकडेही पोहोचली नसल्याचं घरच्यांना समजलं. त्यानंतर, मुलीच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.