Home » माझा बीड जिल्हा » स्वच्छतागृही व जलसुरक्षक यांना प्रक्षिक्षण..

स्वच्छतागृही व जलसुरक्षक यांना प्रक्षिक्षण..

स्वच्छतागृही व जलसुरक्षक यांना प्रक्षिक्षण संपन्न..
अमोल जोशी/ डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा – पंचायत समिती व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन यांच्या वतिने तालुकास्तरीय व जलसुरक्षक यांना बुधवार 12 /9/ 2018 रोजी रेणुका माता मंगल कार्यालय पाटोदा येथे एक दिवशीय प्रक्षिक्षण देण्यात आले .गटविकास अधिकारी राजेन्द्र मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय प्रक्षिक्षणा चे आयोजन करण्यात आले
यावेळी संत गाड़गेबाबा यांच्या प्रतिमेश सभापती पुष्पाबाई सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच पंचायत समिती सदस्य महेन्द्र नागरगोजे यांच्या हस्ते श्रीफळ फोड़ून कार्यक्रम ची सुरूवात करण्यात आली यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
     कुष्ठरोग ,क्षयरोग लसीकरण यांचे महत्त्व पटऊन देण्यात आले वाढीव कुटुंबाचा सव्हेॅ करून ग्रामसेवक मार्फत पंचायत समिती ला सादर करून ज्यांची नावे बेसलाईन मध्ये नाहीत असा कुटूबांना एम.आर.जी.एस .योजनेतुन शौचालय बांधकामासाठी बारा हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे तसेच स्वच्छतागृही यांना आपल्या कामाची भुमिका व जबाबदारी संदर्भात रेखा कवड़े यांनी मार्गदर्शन केले . यावेळी  मोठ्या प्रमाणात आशा सेविका ,ग्रामसेवक स्वच्छतागृही, जलसुरक्षक उपस्थित होते .
    यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. सभापती पुष्पाबाई सोनवणे, पं.स.सदस्य महेन्द्र नागरगोजे, पं स. सदस्य  शेंड़गे , स्वच्छ भारत मशिनचे माहीती संवाद तज्ञ संजय मिसाळ, मनुष्यबळ विकास सल्लागार रेखा कवड़े,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम उबाळे, पञकार विजय जाधव , व सभापती स्विह सहाय्यक नानासाहेब ड़िड़ूळ उपस्थित होते .
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटोदा पंचायत समिती चे जाधव विस्तार अधिकारी, जवकर कक्ष प्रमुख ,शिवाजी जाधव,राख महादेव ,वराट,पुरी ,बुंदे सर, पवार बी.बी.  यांनी मोलाचे योगदान दिले

Leave a Reply

Your email address will not be published.