Home » माझी वडवणी » दोस्तीच्या दुनियेतील ईलाहीखां गेला..

दोस्तीच्या दुनियेतील ईलाहीखां गेला..

दोस्तीच्या दुनियेतील ईलाहीखां गेला..

डोंगरचा राजा / आँनलाईन

हजारो मनावर अधिराज्य करणारे.. हसतमुख चेहरा फादर.. आदरयुक्त व्यवहार.. शून्यातून विश्व निर्माण करणारे.. डोंगरपट्ट्यातील निखळ प्रेम संवाद कर्ते..पठाण ग्रुपचा पाठीराखा.. ऊसतोड कामगारांचा नेता.. आपल्या स्मितहास्यातून सर्वांना आपलेसे करणारे..सर्वांसाठी आदर्श ठरणारे..ईलाहीखां पठाण वय 40 वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शहरातील स्मशानभूमीत हजारो स्नेही जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील रहिवासी असणारे ईलाहीखां पठाण हे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीमत्व. आपल्या कौशल्याच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता अंगी असणारा हा युवक ऊसतोड कामगारांच्या सानिध्यात आला. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्याशी थेट संबंध ठेवत सहकार क्षेत्रात उंच भरारी घेतली.सर्वांसोबत स्नेहाचे संबंध असणाऱ्या ईलाहीखां पठाण यांनी वडवणी शहरात वास्तव्य केले. कुटुंबात आई,भाऊ, पत्नी,दोन मुले,दोन मुली असा मोठा परिवार आहे. सगळ्यांचा संभाळ अगदी प्रामाणिकपणे करत कोणताही वाद विवाद, मत्सर न ठेवता एक सुखी कुटुंब म्हणून तालुका भरात
ईलाहीखां पठाण यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते. साखर कारखान्याच्या कांही कामानिमित्त ते कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे आपल्या मित्रासह गेले होते. दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावलली. घटनेची माहिती वडवणी शहरासह जिल्हाभरात पोहोचली त्यांचे पार्थिव देह सकाळी वडवणी शहरात आणण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी हजारो स्नेहीजनांनी अक्षरश पाणावलेल्या पापण्यांनी अंत्यदर्शन घेतले. ईलाहीखां पठाण हे मुस्लिम समाजाचे होते. त्यांचा स्नेहभाव सर्व जाती-धर्मां सोबत राहिल्याने मोठा संपर्क वाढला होता. अंत्यसंस्कार वेळी सर्व जाती-धर्माचे, तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटनांचे जिल्ह्यातून मान्यवर उपस्थित राहिले होते. शहरातील ईदगाह मैदान या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय नेत्यांनी ईलाहीखां पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबाचे सांत्वनही केले.

Leave a Reply

Your email address will not be published.