मुख्याध्यापकासह शिक्षकांची दांडी..
रविकांत उघडे / डोंगरचा राजा आँनलाईन
— विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या मुख्याध्यापका सह, शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करा-युवा सेना
माजलगाव — तालुक्यातील सावरगाव जि प प्रा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता शाळेला शिक्षक दिनी सामूहिक दांडी मारली.अशा बेजाबदार मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी म्हणून माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे युवा सेनेनी शिस्त भंगाची कारवाई होवी ही बाब लावून धरली आहे.
तालुक्यातील सावरगाव जि प शाळेतील मुख्यध्यापक, शिक्षक यांनी 5 सप्टेंबर रोजी शाळेला वरिष्ठांची परवानगी न घेता शाळेला दांडी मारली होती. हा प्रकार येथील सुशिक्षित तरुण देवदत्त व्यवहारे यांच्या लक्षात आला. सर्व नियम धाब्यावर बसवून येथील सर्व शिक्षक 5 सप्टेंबर रोजी सुटीवर होते.खाजगी कार्यक्रमाला हे सर्व गेल्याचे समजते. खाजगी कार्यक्रमाला सामुदायिक विना रजा सुटीवर जाणे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक नसल्याचे दिसून येते. सरकार शिक्षनावावर कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र येथील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवते विषयी उदासीनता दिसते.
एका विचाराने सामूहिक गैरहजर राहिलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या एक दिवसीय शैक्षणिक नुकसानिस कारणीभूत ठरलेले आहेत.या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई होवी या करिता माजलगाव येथील युवा सेना आक्रमक झाली आहे. येथील काही कामचुकार शिक्षक वर्गावर न जाता शासनाचा मोठा पगार उचलतात. येथील अस्त व्यस्त झालेल्या कारभाराची गोपीनिय चौकशी होवी ,चौकशी दरम्यान मुख्यध्यापक व शिक्षकांचे पगार अदा करू असे ही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.वेळेत कारवाई न झाल्यास जि प बीड येथे आंदोलन छेडन्यात येईल असे युवा सेना च्या प्रसिद्धी पत्रकात मांडण्यात आले आहे.या प्रसिद्धी पत्रकात बाळासाहेब मेंडके, युवासेना ता देवदत्त व्यवहारे उप प्रमुख,, उमेश गोळेकर उपजिल्हा संघटक वि सेना सुंदर इके,शहर प्रमुख युवा सेनासचिन दळवी, यु उ शहर सुरज एखंडे ,चाळक ऋषिकेश बाळासाहेब, शेख तयब, बाबू शेख,असेफ शेख ,इम्रानशेख फरदिन, आसाराम अलझेंडे सुमित आव्हाड गणेश भापकर वसीम शेख शुभम तांगडे
आदी शिवसैनिकांच्या सह्य आहेत.