Home » राजकारण » मी विधानसभा लढवणारच – जगताप

मी विधानसभा लढवणारच – जगताप

मी विधानसभा लढवणारच – जगताप

— शेतकऱ्यांचे ऊस टिपरू शिल्लक ठेवणार नाही.

— सोन्नाखोटा गाव घेतले दत्तक.

— सोन्नाखोटा येथे भव्यशाखेचा शुभारंभ.

वडवणी– गेली पंधरा वर्ष कारखानदारीच्या जोरावर शेतकऱ्यांचा ऊस बांधावर टाकत शेतकऱ्यांना वेठीस धरत मत मागत मोठे नेते फिरत होते.शेतकऱ्यांच्या उसाचे राजकारण करत गोरगरिब शेतकरी हैराण होेत होते. पण आत्ता शेतकरी बांधवांनो घाबरू नका कारण मी तुमच्यासाठी गेली चौदा वर्ष वनवास सोसुन संघर्ष करून छञपती सहकारी साखर कारखाना उभारला आहे. सोन्नाखोटा येथील शेतकऱ्यांना माझा शब्द आहे.गावातील शेतकऱ्याच्या उसाचे टिपरू शिल्लक ठेवणार नाही. तर संपुर्ण सोन्नाखोटाच गावचं मी जाहीर सभेत दत्तक घेत आहे.मी उसाचे राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांपैकी मी नाही कारण माझ्या वडिलांने उसतोड कामगारांचे काम केले याची मला जाणीव आहे.माञ आगामी विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. भुलथापा मारण्यासाठी बरेच जण येतेन माञ शेतकर्यांची पिळवणुक करणाऱ्या बड्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा असे मत छञपती सहकारी साखर कारखाण्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांनी सोन्नाखोटा येथील मोहनदादा मिञ मंडळाच्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
याबबात अधिक माहिती अशी की,
वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथे मोहन दादा जगताप मित्र मंडळाचे मोठ्या थाटामाटात मोहन दादा जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी उपस्थित मोहन दादा जगताप जनविकास आघाडीचे नेते अच्युतराव लाटे,युवा नेते भारत जगताप, संचालक संतोष यादव,जेष्ठ नेते बबनराव सिरसट, कृ.उ.बा.समिती उपसभापती प्रदीप शेळके,युवा नेते राहुल जगताप,रामदीप डाके,मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष शरद यादव,रामदास तिडके,बंडू नाईकवाडे,बिभीषण बडे, सरपंच हरि पवार, परशुराम कांदे, सरपंच सुधाकर करांडे, सरपंच अँड.अनंत लंगडे,संभाजी दराडे,राजेश स्वामी, दिगंबर माने,हितेंद्र काळे,फिरोज इनामदार,दादा गरड,प्रदीप चाळक यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पाडला.
पुढे बोलताना मोहन जगताप म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार आहे तिकीटाचे वेळ आल्यावर बघु ते कोणत्या पक्षाचे घेयचे ते, फक्त तुम्ही माझ्यापाठीमागे उभे राहा. 2019 मध्ये मला मुंबईला पाठवा येताना माञ तुमच्या साठी विकासाची गंगाच घेऊन आल्याशिवाय राहाणार नाही. कुणाच्या धमकीला तुम्ही आत्ता घाबरू नका आत्ता मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.तुमचा संपुर्ण उस मी नेणार आहे. कोणत्याही भुल थापांना बळी पडु नका व आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदानरूपी डोक्यावर आशिर्वाद आसु द्या आसे मत मोहन जगताप यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव बापु खोटे, गणेश खोटे, परसराम ताकपेरे,केशव खोटे, सिध्यशोरराव खोटे, महादेव खोटे, विठ्ठल लाडे, सय्यद तुरा, विक्रम साळुंके, सजय खोटे बाळ डोगरे, परमेश्वर भारती, रमेश चव्हाण, सभाजी माने, मगेश शिदे, आमोल तैर, विठ्ठल परळकर,बाबा केदार, पांडुरंग केदार आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.