Home » देश-विदेश » आ.आर.टी.देशमुखांची ऐतिहासिक नोंद

आ.आर.टी.देशमुखांची ऐतिहासिक नोंद

आ.आर.टी.देशमुखांची ऐतिहासिक नोंद

डोंगरचा राजा / आँनलाईन

मुलीची वैद्यकीय शिक्षणाची फि भरता न आल्याने आत्महत्या केलेल्या आईची करूण कहाणी ऐकल्यानंतर साळीबा येथील शितलला मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी बोलुन विशेष राखीव जागा उपलब्ध करत तीची सर्व फि भरणाऱ्या आमदार आर.टी. देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
शितलचे पालकत्व स्वीकारलेल्या आमदार देशमुख यांनी बीड येथे शितलला नेऊन तीची 1 लाख 62 हजार 500 रुपये वैद्यकीय फि भरून शितल व तिच्या आईचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले. त्यामुळे सर्व सामान्य जनतेतून ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणत आ.आर.टी. देशमुख यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आ.देशमुखांनी केलेले काम खूप लाख मोलाचे आहे,त्यांचे आभार मानण्यासाठी आज साळीबा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार केशवराव आंधळें,नगर अद्यक्ष राजाभाऊ मुंडे,दिनकरराव आंधळे ,बन्सी भाऊ मुंडे,राजाभाऊ मस्के,संजय आंधळे,अमर मस्के,डॉ.नाईकनवरे याची उपस्थिती होती,यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले की माझा हातून खूप चांगले सत्कार्य झाले असून शितल च ऍडमिशन झाले याचा खूप आनंद झाला. शितल चे पुढील पूर्ण शिक्षण मी करणार आहे. तिच्या आईचे व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार ,मी सुद्धा खूप गरिबीतून प्रवास केला म्हणून मला गरिबी काय असते याची जाणिव आहे. शितल मी तुझ्या पाठीशी पालक म्हणून उभा आहे.असे सांगितले व तुझे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून सरकारने विशेष बाब म्हणून तुझ्या प्रवेशासाठी निर्णय घेतला ही ऐतिहासिक नोंद झाली आहे. यावेळी सरपंच रामेश्वर जाधव,शिवाजी तौर,श्रीमंत मुंडे,ईश्वर नाईकवाडे,,गो।विंद मस्के,दता गोडे,गणेश जाधव,सरपंच बालासाहेब राऊत,शिवाजी मुंडे,जालिंदर झाटे,सुग्रीव मुंडे,ईश्वर तांबडे,बद्रीनाथ व्हरकटे,धनंजय जाधव,वैजनाथ जाधव,महादेव जाधव,रमेश ढगे, आकस जाधव,कुंदन मुंडे,मधुकर ठोसर,अर्जुन जाधव,अतुल जाधव,इर्शाद शेख,सह ग्रामस्थ व पत्रकार बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.