Home » माझी वडवणी » मतदान नोंदणी साठी संपर्क साधा – पवार

मतदान नोंदणी साठी संपर्क साधा – पवार

मतदान नोंदणी साठी संपर्क साधा – पवार
डोंगरचा राजा / आँनलाईन
उद्यापासून नवीन मतदार नोंदणीचे प्रक्रिया सुरू होत असून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सबंधित मतदार बंधूंनी तातडीने बंजारा युवाशक्तीच्या कार्यालयास संपर्क साधावा व आपली नावे नव्या यादीत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया राबवावी असे आवाहन बंजारा युवाशक्ती चे संतोष पवार यांनी केले आहे.
वडवणी तालुक्यामध्ये व शहरामध्ये नगरपंचायत अंतर्गत वाड्या वस्ती तांडे आहेत. या वाड्या-वस्त्या तांड्यावरील मतदारांनी आपली नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट व्हावीत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्या एक तारखेपासून नवीन यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होत असून आपल्या हक्काचे मतदान मतदार यादीत नाव समाविष्ट व्हावे यासाठी स्वतःचे आधार ओळखपत्र, दोन फोटो, व शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र सोबत आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवीन मतदार नोंदणी अभियान संतोष पवार यांनी राबविले असून यामध्ये तमाम मतदार बंधू-भगिनींना आपले नाव मतदार यादीत यावे व मतदान करण्यासाठी हक्क बजवावा असे आवाहन पवार यांनी केले आहे.
वडवणी शहरासह तालुक्यात सध्याच्या स्थितीमध्ये ज्या मतदार याद्या आहेत याच्यामध्ये अनेक मतदार हे मयत आहेत, अनेक मतदारांची नावे वगळण्यात आलेले आहेत, ज्यांची नावे मतदार यादीत डबल आहेत , ही प्रक्रिया निवडणूक प्रशासन तातडीने राबवून मतदार यादीतील नावे वगळण्यात येत आहेत. व नवीन नावे देखील मतदार यादीत यावेत म्हणून प्रशासन प्रक्रिया रागवत आहे. सदर याद्या उद्या एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होत असून या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याचीही खात्री करणे गरजेचे आहे. आपले नाव मतदार यादीत यावे यासाठी अत्यंत तातडीने आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.