Home » माझी वडवणी » सोनाखोट्टा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

सोनाखोट्टा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

सोनाखोट्टा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— सोनाखोट्टा ग्रामपंचायत मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
सोन्नाखोट्टा ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षीही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
याबाबत अधिक वृत्त असे की सोन्ना खोटा येथील ग्रामपंचायत च्या वतीने प्रतिवर्षी सरपंचाच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षीही सरपंच सौ.गिताबाई गंगाधर भारती यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकताच एक कार्यक्रम घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय आंधळे,सभापती गणेश शिंदे, नगरसेवक आत्माराम जमाले, महादेव महाराज खोटे, केंद्रप्रमुख गोविंद रामदासी, केंद्रीय मुख्याध्यापक सुनिल मुंडे, मुख्याध्यापक आश्रुबा मुंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपती खोटे, ग्रामसेवक एस एम म्हेत्रे,सतिष खोटे,सह आदींची उपस्थिती होती.आलेल्या मान्यवरांच्या हस्ते  दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार आश्रुबा मुंडे,गोरक्षनाथ मुंडे, मोहन जाधव यांना संपूर्ण पोषाख, स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मानपूर्वक
प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय आंधळे म्हणाले की वडवणी तालुक्यात आदर्श शिक्षक पुरस्कार हा तत्कालीन सभापती सौ सुलोचनाताई आंधळे यांनी सुरू केला. मात्र त्यांच्या कार्यकाळानंतर याच्यामध्ये खंड पडला. आगामी काळात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रिया सुरू करणे गरजेचे असून विद्यमान सभापती यांनी याबाबत लक्ष वेधून  पंचायत समितीच्या मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करावेत व तालुका स्तरावर एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन या पुरस्काराची प्रक्रिया राबविली पाहिजे.यासाठी आम्ही मदत देण्यास तयार आहोत.
 त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत तालुक्यात होणाऱ्या शासकीय विकास कामांना संबंधित जिल्हा परिषद शाळांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आपण पाहतो केंद्र सरकार व राज्य सरकार थेट ग्रामपंचायतला विकास कामासाठी अनुदान देत आहे. विकास योजना राबवत आहे. मात्र त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे सहकार्य आवश्यक असते त्यासाठी आगामी काळात ज्या काही योजना गावांतर्गत विकास कामासाठी येथील त्यासाठी संबंधित शाळांनी सहकार्य करावे असे आवाहनही सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय आंधळे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी संपादक अनिल वाघमारे केंद्रप्रमुख गोविंद रामदासी केंद्रीय मुख्याध्यापक सुनील मुंडे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव मुळे सर हे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलांनी मुलींनी स्वागतपर गीताने करून सर्वांनाच एक वेगळा आनंद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.