पाटोदा तहसीलदारांना निवेदन..
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा– नाभिक (नाव्ही) समाजासह बारा बलुतेदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभीक महामंडळ पाटोदा यांच्या वतीने आज पाटोदा तहसीलदाराकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.
जागतीकरणामुळे समाजाचे व्यवसाय काल बाह्य होत आहेत. समाजावर ऊपासमारीची वेळ आली आहे.
२०१४ च्या निवडनुकीत भाजप सरकारने बलुतेदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्याची अजुनही अंमलबजावणी झाली नाही. नाव्ही समाजाला केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनुसुचीत जातीमध्ये समावेश करूण घेन्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मा.न्या. ऍश्वर्या आयोगाने २७% आरक्षणाचे विभाजन करुण स्वतंत्र ९% देण्याची शिफारस मा. पंतप्रधानाकडे केली होती.ती त्वरीत लागु करावी.
बलुतेदारांना व्यवसायासाठी २५लाख रू अल्प दरात कर्ज मिळावे. ज्या शासकीय जागेवर दुकाने आहेत ति जागा त्यांना कायम करावी.
बारा बलुतेदारांना आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे. जिवा महाले व संत गाडगेबाबा स्मारक ऊभा करावे.नगर,लातुर गेवराई ,जळगाव,या ठिकाणी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला होता त्यांना न्याय मिळवुन द्यावा.अशा मागणीचे निवेदन देण्यात यावेळी देण्यात आले .
यावेळी प्रा.सोमीनाथ खंडागळे, बाप्पा खामकर, जितेंद्र सांगळे, दुधाळ, नामदेव काशिद, अक्षय खामकर, यांच्यासह नाभिक समाज बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते.