गोरक्षनाथ टेकडीवर उसळला जनसागर
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून परिचित श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी वर थोर संत किसनबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेला अक्षरशः भाविक भक्तांचा जनसागर लोटला होता. ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी आपल्या कीर्तन सेवेत कृष्णाने जसा सवंगड्यांचा मेळा जमवला तसाच थोर संत किसनबाबांची लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज किर्ती पाहण्याचा योग आला. बाबांचे भक्त त्यांच्यावर व गोरक्षनाथ टेकडी वर मनापासून भक्ती करतात. हजारो भाविकांनी या प्रसंगी महाप्रसाद घेतला. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे श्रावण महिन्यात वैकुंठवासी थोर संत किसनबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त टेकडीचे मठाधिपती ह.भ.प.नवनाथबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाची सांगता दिनांक 26 रविवार ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सुरू झाली. तुकाराम महाराज यांच्या गवळणपर अभंगाने किर्तन सेवेस प्रारंभ झाला. श्रीकृष्णाने आपल्या विविध चमत्कारातून तहानलेल्यांना भुकेलेल्यांना एकत्र करून महाकाला घडवला. त्याचप्रमाणे थोर संत किसनबाबांनी गोरक्षनाथ टेकडीला राज्यातून भाविक भक्तांनी जोडून गोरक्षनाथ टेकडीवर भक्तांचा जनसागर जोडला आहे.या प्रसंगी आ.जयदत्त क्षीरसागर , माजी मंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, सभापती दिनकर कदम,जि. प. सदस्य गणपत डोईफोडे, दिलीप गोरे, नितीन धांडे, महादेव उबाळे, शिवाजी फड, कल्याण आखाडे ,अॅड.राजेंद्र राऊत, अरुण डाके यांच्यासह हजारो भाविकांची याप्रसंगी उपस्थिती होती. गंगाधर घुमरे यांनी संस्थानच्या वतीने विकासाच्या अनेक योजनांची याप्रसंगी मागणी केली. तसेच चंद्रकांत फड यांनी गोरक्षनाथ टेकडी हे राजकीय तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही नेता ,पक्ष विकास कामाला नाही म्हणत नाही. संस्थांनच्या विकासाला सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. काल्याच्या कीर्तनानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले