Home » माझी वडवणी » आरक्षणासाठी मराठा आईची आत्महत्या.

आरक्षणासाठी मराठा आईची आत्महत्या.

आरक्षणासाठी मराठा आईची आत्महत्या.
डोंगरचा राजा / आँनलाईन..
—  मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत..
—  मराठा शेतकरी आईची आत्महत्या..
—  वडवणी तालुक्यातील साळींबाची घटना
वडवणी — लोकांच्या शेतात मजुरी करुन मुलीला बारावी नंतर वैद्यकिय शिक्षणाच्या पुर्व परिक्षेच्या तयारीसाठी लातुरला ठेवले. मुलीने मेहनतही घेतली माञ आरक्षण नसल्याने मुलीचा नंबर बीडीएस या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी लागला. एवढे होऊनही  मुलीच्या डॉक्टर पदवी शिक्षणाच्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने  मराठा समाजाच्या शेतकरी आईने  जाळून घेऊन आत्महत्या केली.  वडवणी तालुक्यातील साळींबा येथिल घटनेने मराठा समाजाचा  आरक्षणासाठी आनखी एक बळी गेला आहे. या घटनेने  संपुर्ण तालुका सुन्न झाला आहे.
                   या घटने बाबत मिळलेली अधिक माहीती अशी की वडवणी तालुक्यातील साळींबा येथील रहिवाशी आशोक  शेषराव जाधव यांची  एकुलती एक मुलगी  शितल हिने बारावी परिक्षेत यश मिळविले होते. डाॅक्टर होण्याची शितलची इच्छा होती. माञ अशोक जाधव हे मराठा समाजाचे आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत  गरीब असल्याने मुलीच्या शिक्षणाचा खर्च त्यांना पेलने शक्य नव्हते. गेल्या काही वर्षापुर्वी मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जाधव यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मोलमजुरी करुन त्यांनी शितलला लातुरला ठेवले होते.   गेल्या दोन वर्षापासुन लातूर या ठिकाणी मेडिकल सी.ई.टी. परिक्षेची शितल  तयारी करीत होती. तिला चांगले गुण मिळाले होते माञ मराठा समाजाच्या आरक्षणाचे गाजर फोल निघाल्याने  तिचा यावर्षी  बीडीएस या डॉक्टर पदवीला नंबर लागला होता. तिलाही या पदवीला प्रवेश घ्यायचा होता. परंतु घरात विश्व दारिद्रय असल्याने आई, वडील यांच्याकडे पैसे नसल्याने  शितल हिचा प्रवेश घेऊ शकला नाही. प्रवेशाची अंतिम दि.१८ अॉगस्ट होता. प्रवेशासाठी आवश्यक रक्कम नसल्याने शितलचा प्रवेश घेणे शक्य झाले नाही.  शितलने शिक्षणात घेतलेली मेहनत त्यातून मिळालेले यश, भविष्यात होणारी डॉक्टर, आणि सध्या नसलेला पैसा, यामुळे स्वप्नावर पाणी फेरले  असल्याने शितल हिचा बीडीएस या डॉक्टर पदवीला पैसे नसल्याने प्रवेश मिळाला नसल्याने तिची आई चिंतातूर झाली होती. आपल्या एकुलत्या एक मुलीला शिक्षणाला पैसे भरु शकलो नसल्याने नैराश्य आले आणि यातुनच शितलची आई  सरस्वती आशोक जाधव वय-४० या मातेनं घरात कुणीच नसल्याचे पाहुण दि.२१ अॉगस्ट रोजी सकाळी अंगावर रॉकेल ओतुन जाळून घेतले यात त्या जवळपास ८० टक्के भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालय बीड याठिकाणी दाखल करण्यात आले होते.  परस्थिती गंभीर आसल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु सरस्वती जाधव यांनी उपचाराला साथ न दिल्यामुळे रविवार दि २६ रोजी स  आठ वाजत त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  मुलीच्या बीडीएस या डॉक्टर पदवी प्रवेशाला पैसे नसल्याने मुलगी डॉक्टर बनु शकली नसल्याने नैराश्य आलेल्या आईने जाळून घेऊन आत्महत्या केल्याने या घटनेन तालुका सुन्न झाला आहे. त्यांच्यावर साळींबा येथिल स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.