Home » माझी वडवणी » वडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.

वडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.

वडवणीकरांचे केरळसाठी १ लाख ११०० रु.
डोंगरचा राजा / आँनलाईन..
वडवणी — केरळ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेकडो जणांचे प्राण जावुन तेथील जनता बेघर झाली आहे. व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या मदतीसाठी शनिवार दि २५ ऑगस्ट रोजी वडवणीतील सर्व संघटनां व सर्व शाळा,महा विद्यालय यांच्या हाकेला प्रतिसाद देत वडवणीतील सर्व व्यापारी बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने चेक व नगदी स्वरुपात १ लाख १ हजार १०० रुपयांचा मदत निधी जमा झाला आहे. अजुन दानशुर व्यक्तींचा व संघटनांचा निधी जमा होणे सुरूच असुन आकडा वाढण्याची शक्यता आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की केरळ मध्ये भयानक पावसाने तांडव घालून हा..हा..कार माजवला तेथे भयानक पूरपरिस्थिती निर्माण होऊन यामध्ये ३५० हून अधिक जनतेचे बळी गेले आहेत. तेथील जनता बेघर झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या संदर्भात वडवणी येथील रोटरी क्लबच्या पुढाकाराने नुकतीच एक व्यापक बैठक घेऊन यामध्ये मुदतीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. आणि त्यानुसार वडवणी शहरांमधील शनिवार दि २५ रोजी सर्व शाळा महाविद्यालय, डॉक्टर संघटना,वकील संघ,पत्रकार संघ,सरपंच संघटना, एस एफ आय संघटना,व्यापारी संघटना, स्काऊट व गाईड विद्यार्थी, रोटरी क्लब यांच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,हनुमान मंदिर, राम मंदिर,चिंचवण रोड,वसंतराव नाईक चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अण्णाभाऊ साठे चौक,अहिल्याबाई होळकर चौक. या मदत रॅलीमध्ये सर्व संघटनेच्या आव्हाणाला प्रतिसाद देत वडवणीतील सर्व व्यापारी बांधवांनीही भर भरून प्रतिसाद दिला.यामध्ये धनादेश व नगदी स्वरूपात १ लाख ११०० रुपयाचा मदत निधी जमा झाला आहे. व अजुन दानशुर व्यक्तींचा व संघटनांचा निधीचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे.सहकार्य करणाऱ्या सर्व संघटनेचे, व्यापारी बांधवांचे सर्वांचे आभार आयोजक रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने मानले आहेत.
ठळक क्षणचित्रे…
मदत पोलिस प्रशासनाने केली,
मदत वृद्धांनीही केली,
मदत विद्यार्थ्यांनीही केली,
मदत महिलांनीही केली,
मदत प्रवाशांनीही केली,
मदत अपंगांनी ही केली,
मदत महिला दक्षता पथकाने ही केली.. अन्  ज्यांना स्व:तालाच मदतीची गरज आहे.. त्यांनी देखील आपणांस मिळालेल्या मदतीतुन कांही रक्कम केरळ राज्यातील पुर परिस्थितीचे भान लक्षात घेऊन त्यांनीही मदत केली..

Leave a Reply

Your email address will not be published.