Home » माझी वडवणी » ना.पंकजाताईंच्या उपस्थितीत महामेळावा – आंधळे

ना.पंकजाताईंच्या उपस्थितीत महामेळावा – आंधळे

ना.पंकजाताईंच्या उपस्थितीत महामेळावा – आंधळे

डोंगरचा राजा / आँनलाईन

ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यासंदर्भात असणा-या संपाची सुरुवात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातून झाली.नंतरच्या काळातही त्याला खंबीर साथ आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची मिळाली. ऊसतोड मजूर मुकादम आणि वाहतूकदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.या संपात सर्व मुकादमांनी वाहतूकदारांनी व ऊस तोड मजुरांनी सहभागी व्हावे.असे आवाहन गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले.ते आज २४ आॅगस्ट २०१८ रोजी बोधेगाव तालुका शेवगाव, आणि गेवराई येथील आयोजित केलेल्या ऊस तोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या बैठकीत बोलत होते.

1 सप्टेंबर रोजी ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांना खंबीर साथ देत नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय महामेळावा घेण्यात येत असून राज्यभरातून ऊसतोड मजूर मुकदम शक्तीनिशी ऊतरून शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा योग आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यस्तरीय महामेळाव्यात ऊसतोड मजुरांना पेन्शन मिळाली पाहिजे, ऊसतोड मजुरांना विमा मिळाला पाहिजे, विम्याची रक्कम कारखान्याने भरावी, दारिद्र रेषे मध्ये नाव समाविष्ट करावे‌. व त्यानुसार च्या सर्व सवलती ऊसतोड मजुरांना मिळाल्या पाहिजेत, ऊसतोड मजुरांच्या मुलांना निवासी वस्तीग्रह दिले पाहिजे, त्याचबरोबर ऊसतोड मजूर आणि त्यांच्या जनावरांना आरोग्यासाठी जाग्यावरच मोफत सुविधा पुरविल्या पाहिजेत, या मागण्या मान्य करून घेण्याचा योग आला आहे. कारण राज्याच्या ग्रामविकास मंत्री बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची खंबीर साथ आपल्याला मिळाली आहे. राज्यव्यापी महामेळावा येत्या एक तारखेला होत आहे. या राज्यव्यापी महामेळाव्यात मुकदम व वाहतुकदारांनी शक्तीनिशी एक होऊन शक्तिप्रदर्शन दाखवून द्यावे.त्याच
प्रमाणेआपण स्वखर्चाने आपल्या अंतर्गत असणाऱ्या ऊसतोड मजुरांना सोबत घेऊन सामील व्हावे. असे आवाहनही माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले.

बैठकीस गोपीनाथराव मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष श्रीमंतराव जायभाये, बाबासाहेब बांगर, उपाध्यक्ष संजय तिडके, सचिव सुखदेव सानप, कोषाध्यक्ष गोरख रसाळ, सर्जेराव डोईफोडे, रामहरी दराडे, कृष्णा तिडके, सुरेश वनवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. बोधेगाव येथील
त्रीबंकराव चीमटे ,सुखदेव गुटे, तुळशीराम फाटे, गोरख राठौड, शाहदेव ढाकणे, सदिपान चव्हाण, आंबादास ढाकणे तसेच गेवराई येथील बंडू राठौड, किसन मोहिते, शिवाजी वखडे,आरून पवार, भारत राठौड, वामन पवार ,अनिल राठौड सह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.