महामेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – आंधळे
डोंगरचा राजा / आँनलाईन
— ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदारांच्या राज्यव्यापी महामेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा — मा. आ.केशवराव आंधळे
ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यासंदर्भात असणा-या संपाची सुरुवात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातून झाली.नंतरच्या काळातही त्याला खंबीर साथ आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची मिळाली. ऊसतोड मजूर मुकादम आणि वाहतूकदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.या संपात सर्व मुकादमांनी वाहतूकदारांनी व ऊस तोड मजुरांनी सहभागी व्हावे.असे आवाहन गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले.ते वडवणी येथील बचत गट भवन च्या सभागृहात आयोजित केलेल्या ऊस तोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या एकत्रित बैठकीत बोलत होते.
ऊस तोडणी, मुकादम व वाहतूकीचा हा व्यवसाय ऊस तोडणी कामगारांना,मुकादमांना व वाहतूकदारांना न परवडणारा आहे. त्यांची मजुरी तुटपुंजी असून या मजुरीमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांना 228 रुपयेप्रमाणे तर मशीनला 400 रुपयांचा भाव दिला जात आहे. एवढी मोठी तफावत यामध्ये असून मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे.त्यामुळे हा धंदा आता न परवडणारा झाला आहे. खरेतर हार्वेस्टर मशीन सारखीच मजुरी ऊसतोड मजुरांना देणे गरजेचे आहे. मुकादमांना ही कारखान्याच्या अडेलतट्टू धोरणामुळे खाजगी सावकाराकडून पैसे आणावे लागतात. व व्यवसाय करावा लागतो आहे. संपाचा मुख्य उद्देशच वरील प्रमाणे ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांच्या मजुरीत वाढ व्हावी हाच आहे. आतापर्यंत जेवढ्या वाढी झाल्या त्या केवळ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यामुळेच झाल्या आहेत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.
1 सप्टेंबर रोजी ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांना खंबीर साथ देत नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय महामेळावा घेण्यात येत असून राज्यभरातून ऊसतोड मजूर मुकदम शक्तीनिशी ऊतरून शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा योग आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यस्तरीय महामेळाव्यात ऊसतोड मजुरांना पेन्शन मिळाली पाहिजे, ऊसतोड मजुरांना विमा मिळाला पाहिजे, विम्याची रक्कम कारखान्याने भरावी, दारिद्र रेषे मध्ये नाव समाविष्ट करावे. व त्यानुसार च्या सर्व सवलती ऊसतोड मजुरांना मिळाल्या पाहिजेत, ऊसतोड मजुरांच्या मुलांना निवासी वस्तीग्रह दिले पाहिजे, त्याचबरोबर ऊसतोड मजूर आणि त्यांच्या जनावरांना आरोग्यासाठी जाग्यावरच मोफत सुविधा पुरविल्या पाहिजेत, या मागण्या मान्य करून घेण्याचा योग आला आहे. कारण राज्याच्या ग्रामविकास मंत्री बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची खंबीर साथ आपल्याला मिळाली आहे.
ऊसतोड मजूर,मुकादम आणि वाहतूकदार हे आपल्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी सक्रिय होत नसल्याचे दिसून येत आहे.आता मात्र गप्प बसून चालणार नाही.आमचा कोणाचाही यामध्ये फायदा नाही उलट तोटा मात्र गोरगरिब ऊसतोड मजुरांना, मुकदम व वाहतूकदार यांना त्यांच्या हक्काची वाढ मिळावी यासाठी आम्ही आपणास हाक देतो आहोत मात्र आपण त्या हाकेला ओ देत नसल्याचे दिसत आहे. आता मात्र गप्प बसून चालणार नाही. राज्यव्यापी महामेळावा येत्या एक तारखेला होत आहे. या राज्यव्यापी महामेळाव्यात मुकदम व वाहतुकदारांनी शक्तीनिशी एक होऊन शक्तिप्रदर्शन दाखवून द्यावे.त्याचप्रमाणेआपण
स्वखर्चाने आपल्या अंतर्गत असणाऱ्या ऊसतोड मजुरांना सोबत घेऊन सामील व्हावे. असे आवाहनही माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केले.
बैठकीस गोपीनाथराव मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष श्रीमंतराव जायभाये, उपाध्यक्ष संजय तिडके, सचिव सुखदेव सानप, कोषाध्यक्ष गोरख रसाळ, सर्जेराव डोईफोडे, रामहरी दराडे, कृष्णा तिडके, सुरेश वनवे,बन्सी मुंडे, संजय आंधळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका कार्यकारिणीच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या.यामध्ये तालुकाध्यक्ष पदी उध्दव दराडे, उपाध्यक्षपदी सुधाकर मुंडे, सचिवपदी गोपाळ पालकर, कोषाध्यक्षपदी गोपाळ जाधवर, सहसचिवपदी पवार यांच्या निवडी करण्यात आल्या.बैठकीस आलेल्या वरील मान्यवरांचे स्वागत सत्कारही करण्यात आला. यावेळी मेनमुकादम दराडे बापू ,बळी आण्णा चोले ,उत्तम नेरकर,खाजाभाई शेख, दिनेश नाईकवाडे, बजरंग गायकवाड, विलास वडणे, सचिन सानप,पिंटु मुंडे,रघु आंधळे, सुंदर नाईकवाडे,अंगदराव शेळके सह तालुक्यातील संपूर्ण ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीसीसी बँक संचालक बाबरी मुंडे यांनी केले.