माजलगांवात अनुदान लढा समितीची स्थापना
डोंगरचा राजा / आँनलाईन
विना अनुदानित तुकड्यांना अनुदान देण्याची मागणी.
– माजलगांवात अनुदान लढा समितीची स्थापना
माजलगांव — अनुदानिती शाळेत विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या मंजुर तुकड्यांना शासनाच्या अनुदान सुत्रानुसार शासनाने तात्काळ अनुदान द्यावे व त्याचबरोबर शाळेत रिक्त होणा-या अनुदानित जागेवर विनाअनुदानावर काम करणा-या शिक्षक बदलीस मान्यता द्यावी या मागण्याचे निवेदन शासनाकडे देण्याचे ठरविण्यात आले.
याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थांनी माजी मुख्याध्यापक तथा पत्रकार संतोष मुळी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्याध्यापक प्रभाकर साळेगांवकर, विभागप्रमुख सुमंत गायकवाड, गोपाळ राठोड यांची उपस्थिती होती. सन 2002 – 03 ते 2012 – 13 पासुन शासनाने मान्यता दिलेल्या विनाअनुदान तुकडीवर शिक्षक काम करतात पण आता शिक्षकांची सहनशिलता संपलेली असुन शासनाने सदरील तुकड्यांना तात्काळ टप्यानुसार अनुदान द्यावे यासाठी अनुदान लढा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपती एस. आर. मुळी, कार्याध्यक्ष आर. एल. आवाड, उपाध्यक्ष एस. पी. मोरे, सरचिटणीस सुमंत गायकवाड, चिटणीस एस. के. मुंडे, कोषाध्यक्ष बी. एन. जाधव, सदस्य गोपाळ राठोड, के. एम. नरसिंगे, महिला प्रतिनिधी प्रतिभा गणोरकर यांची निवड करण्यात आली. या बैठकीला एस. पी. मोरे, एस. एस. आगे, एस. के. मुंडे, पी. आर. काळे, मतीन शेख, अलका जोगदंड, ज्योती दायमा यांचेसह विनाअनुदान तत्वावर काम करणा-या अनेक शिक्षकांची उपस्थिती होती.