Home » माझा बीड जिल्हा » नऊ महसूल मंडळात जोरदार पाऊस..

नऊ महसूल मंडळात जोरदार पाऊस..

नऊ महसूल मंडळात जोरदार पाऊस..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड जिल्ह्यातील खरिपाची पिके हातची गेली असताना तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळ उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. गुरुवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाल्यानंतर रात्री माजलगाव वडवणी गेवराई तालुक्यात जोरदार पाऊस झाला.त्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यातील महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.यंदा खरिपात जोरदार पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने व्यक्त केले होते. परंतु जून ,जुलै महिन्यामध्ये पडलेल्या चार-पाच पावसानंतर तब्बल एक महिना पाऊस गायब झाला. इतकी मोठी उघडीप मिळाल्याने पेरलेली पिके अडचणीत आले होते.मात्र याही स्थितीमध्ये तग धरून राहिलेल्या खरीप पिकांना आता पडणाऱ्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळणार असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी कमी कालावधीच्या मूग उडीद या पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली तर कापसावर अनेक ठिकाणी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी लागवड केलेला कापूस अपेक्षेइतका वाढलेला नाही असे असताना पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. येथील पाणी आटू लागले होते या दरम्यान बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम राहिली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आज 17 ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात अवघ्या 39. 68 टक्के पाऊस झाला आहे. तर मागील 24 तासात सरासरीच्या तुलनेत 43.10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये माजलगाव तालुक्‍यात सर्वाधिक 78. 33 टक्के पाऊस झाला असून या तालुक्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्यमापक नोंदवण्यात आली आहे. 63 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टी मानला जातो मात्र जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे

अतिवृष्टीची नोंद झाली आहे..
————————————

गेवराई 70 मिलिमीटर
धोंडराई 82 मिलिमीटर
तलवाडा 65 मिलिमीटर
रेवकी 75 मिलिमीटर
माजलगाव 90 मिलीमीटर
गंगामसला 110 मिलिमीटर
दिंद्रुड 65 मिलिमीटर
किट्टी आडगाव 95 मिलिमीटर
केज 71 मिलिमीटर

तालुकानिहाय पाऊस..
—————————-

बीड 32.18
पाटोदा 40.50
आष्टी 38. 71
गेवराई 56.00
शिरूर 25.00
वडवणी 56.00
आंबेजोगाई 37. 60
माजलगाव 78. 33
केज 42. 14
धारूर 24.00
परळी 43.80

Leave a Reply

Your email address will not be published.