Home » देश-विदेश » वाजपेयी यांच्याबद्दल विशेष माहिती..

वाजपेयी यांच्याबद्दल विशेष माहिती..

वाजपेयी यांच्याबद्दल विशेष माहिती..

डोंगरचा राजा / आँनलाईन

1) अटल बिहारी वाजपेयी आपल्या वडिलांबरोबरच कानपूर येथील डीएव्ही कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे कायद्याचे शिक्षण घेताना दोघेही एकाच वर्गात होते व हॉस्टेलमध्ये एकाच रुममध्ये राहत होते.

2) अटल बिहारी वाजपेयी यांना पत्रकार व्हायचे होते. पण मी चुकून राजकारणात आलो, असे वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

3) 26 विरोधी पक्षांच्या सोबतीने सरकार चालवणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. तीन वेळा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

4) अटल बिहारी वाजपेयी हे असे एकमेव बिगर काँग्रेसी नेता होते ज्यांनी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

5) वाजपेयी 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. तसेच दोन वेळा त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली.

6) माजी पंतप्रधान नरसिंह राव हे वाजपेयी यांना आपले राजकीय गुरू मानत.

7) वाजपेयी यांच्या आरएसएस प्रवेशावरून त्यांची बहीण नाराज होती. अनेकवेळा तिने वाजपेयींची खाकी पँट घराबाहेर फेकून दिली होती. वाजपेयींचे वडील सरकारी नोकरीत होते. वाजपेयींचे आरएसएसमध्ये जाणे त्यांना रुचले नव्हते.

8) वाजपेयी एकमेव असे नेते होते जे चार राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व दिल्लीतून निवडून लोकसभेत पोहोचले होते.

9) संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीतून भाषण करणारे ते एकमेव परराष्ट्र मंत्री होते.

10) विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान जय किसान या घोषणेत बदल करून “जय जवान जय किसान, जय विज्ञान ” असा नारा दिला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.