Home » माझी वडवणी » देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – रिपाई

देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – रिपाई

देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – रिपाई

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— भारतीय संविधान जाळणाऱ्या देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – रिपाई

वडवणी — दिल्ली येथे मनुवादी ब्राह्मण जातीयवाद्यांनी पुन्हा आपली औकात दाखवण्यास सुरू केले असून या जातीयवादी मनुवादीवाद्यांनी भारतीय संविधान टारगेट करून या संविधानाच्या प्रति जाळण्याचा प्रयत्न केला यातील यातील आरोपींवर कठोरात कठोर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे रिपाइंच्यावतीने तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांनी केली आहे.

दिल्ली येथे मनुवादी ब्राह्मण जातीयवाद्यांनी पुन्हा आपली औकात दाखवण्यास सुरू केली असून या जातीयवादी मनुवादीवाद्यांनी आता भारतीय संविधानला टारगेट केले. त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रति जाळून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. यामधील आरोपीवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा
पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी तालुका रिपाइंच्यावतीने तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांच्यासह अनेकांनी वडवणी येथील पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यातील आरोपीवर तात्काळ देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष महादेव उजगरे,
शहराध्यक्ष प्रकाश तांगडे, माजी सरपंच राजू
वाघमारे, शाम वाघमारे, लक्ष्मण झोडगे , नितीन झोडगे ,अभिमान उजगरे ,शिवाजी गायकवाड, संजय डोंगरे ,रामभाऊ डोंगरे, राजेभाऊ डोंगरे ,महेश साळवे, कान्होबा जावळे ,मोहन काकडे, दीपक गलांडे ,
राजेभाऊ आवाड ,समाधान डोंगरे ,सिद्धार्थ उजगरे ,अशोक उजगरे, दादा डावकर, राजेश घाडगे ,सतीश उजगरे ,रमेश गवळी सह आदींनी पोलीस निरीक्षक खाडे यांच्या कडे निवेदनाची प्रत सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published.