Home » ब्रेकिंग न्यूज » आता आस परतीच्या पावसाचीच..

आता आस परतीच्या पावसाचीच..

आता आस परतीच्या पावसाचीच..

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसाची ओढ.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे मागील तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना परतीच्या पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान पुढील आठवडाभर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडणार आहेत. पुढील आठवड्यात देशाच्या उत्तर भागात मान्सून अधिक सक्रिय राहणार आहे. उत्तर भागात मान्सून सरकल्याने या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल त्यामुळे उत्तरेकडील राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य भारतात मान्सून सक्रिय होण्यासाठी फारशी अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे पावसाने दडी मारली आहे.राज्यात जून मध्ये दहा ते वीस तारखे दरम्यान पावसाचा खंड पडला होता. त्यानंतर पावसास चांगली सुरूवात झाली होती. जुलैपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावलेली नाही. मागील वर्षीही जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने सुमारे सहा ते सात आठवड्यांची ओढ दिली होती. यंदाही तशीच परिस्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.