Home » माझी वडवणी » समाजाला ८% आरक्षणाची गरज — आंधळे

समाजाला ८% आरक्षणाची गरज — आंधळे

समाजाला ८% आरक्षणाची गरज — आंधळे

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— लोकसंख्येच्या तुलनेत समाजाला ८% आरक्षणाची गरज :— मा.आ.आंधळे

— वडवणीच्या वंजारी समाजाच्या बैठकीत मा.आ.केशवराव आंधळे यांचे मत

वडवणी – भारतात वंजारी समाजाची लोकसंख्या आठ टक्के आहे.आणि सध्या वंजारी समाज हा एन.टी.आरक्षणाच्या वर्गवारीत भरडला जात आहे.त्यामुळे गुणवत्ता आसुनसुद्धा त्याचा काहीच फायदा होत नाही.असे मत माजी आमदार केशवराव आंधळे यांनी वडवणी येथील बचतगट भवनातील वंजारी समाजाच्या आरक्षण चिंतन बैठकीत व्यक्त केले.
यावेळी विचारपीठावर जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप,कृउबा समितीचे सभापती दिनकरराव आंधळे,प्रा.सोमनाथ बडे,मोहनराव मुंडे,बन्सी मुंडे,जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब घुगे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय आंधळे,सचिन डोईफोडे,तेजस नेहरकर,शिवराज बांगर,सतिष बडे,अमोलराजे आंधळे,बिभीषण आंधळे,भास्कर मुंडे,श्रीराम मुंडे,अशोक घुगे,सुग्रीव मुंडे,महेश ( मुन्न् ) मुंडे,रमेश मुंडे,सुधाकर मुंडे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.पुढे बोलतांना माजी आमदार केशवराव आंधळे म्हणाले की,वंजारी समाज हा एन.टी.मधील अ,ब,क,ड, या वर्गवारीत भरडत आहे.यामुळे समाजाला केवळ दोन टक्के आरक्षण मिळते.एवढ्या आरक्षणाने समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत काहीच फायदा होत नाही.त्यामुळे एन.टी.ची वर्गवारी रद्द करून स्वतंत्र एन.टी.मध्ये आरक्षण द्यावे.या समांतर आरक्षणाचा गुणवत्ता असलेल्यांना संधी मिळत नाही.ते समांतर आरक्षण रद्द करावे असेही ते शेवटी म्हणाले.जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप म्हणाले की,भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत वंजारी समाजाला ८% आरक्षणाची आवश्यकता आहे.एन.टी.च्या वर्गवारीने समाजातील गुणवंताना पात्रता असुनही डावलले जाते.त्यामुळे वंजारी समाजाला ८% आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा वंजारी समाजाला परत ओबीसीमध्ये दाखल करा.असे ही ते यावेळी बोलतांना ते म्हणाले.या बैठकीत प्रा.सोमनाथ बडे,बप्पासाहेब घुगे,बन्सी मुंडे,शिवराज बांगर,नगरसेवक सतिष बडे,सचिन डोईफोडे श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे,यांनीही मार्गदर्शन केले.बैठकीचे सुत्रसंचलन व अभार श्रीराम मुंडे यांनी मानले.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

Leave a Reply

Your email address will not be published.