Home » माझी वडवणी » सर्व शाळा, महाविद्यालये आज बंद..

सर्व शाळा, महाविद्यालये आज बंद..

सर्व शाळा, महाविद्यालये आज बंद..

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— जिल्हाधिकारी यांचे शिक्षणाधिका-यांना आदेश.

बीड — जिल्ह्यातील सर्व प्राथमीक, माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालये मराठा आंदोलनामुळे बंद ठेवण्यात यावेत असे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

या बाबत माहिती अशी की ९ ऑगस्ट या क्रांती दिनी मराठा समाजाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कानाकोपरयात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या बंदचे पुर्ण नियोजन करण्यात आले आहे. गावोगावी बंद कडक पद्धतीने बंद पार पाडण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी योजना आखल्या आहेत. शासकीय यंञनेवर मराठा समाज संतप्त झालेला आहे. त्यामुळे आंदोलन काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बीडच्या जिल्हाधिकारयांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय गुरुवारी ९ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी एका लेखी पञाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आज गुरुवारी बंद ठेवण्यात यावेत असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले आहे.

फोटो ओळी

बीडच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना याच पञाद्वारे आदेश जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.