तरुणांचाही व्यसनमुक्तीचा निर्धार..
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून साठ तरुणांनी व्यसनमुक्तीचे घेतले वचन.
माजलगाव तालुक्यातील टकारवाडी येथील युवकांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिराच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा निर्धार केला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कर्मयोग या शिबिरांतर्गत येथील तरुणांनी व्यसनमुक्ती करत समाजासमोर आदर्श निर्माण केला असून यापुढे टकारवाडीमध्ये व्यसनांना थारा मिळू देणार नाही असा सर्व ग्रामस्थांनी निर्धार केला.
तणावमुक्त आणि प्रसन्नता, सजगता आणि वेळेचे नियोजन, उत्साह आणि सकारात्मकता, भावनिक स्थिरता आणि नातेसंबंध,आनंदी मन व स्वस्थ शरीर, एकाग्रता आणि संवाद कौशल्य आदी जीवनावश्यक बाबीं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कर्मयोग शिबिरांमधून जीवन जगण्याची कला या तरुणांना मिळाली असून पुढील काळात सर्व ग्रामस्थांना आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रवाहात ओढत गाव व्यसनमुक्त करणार असल्याचे तरुणांनी सांगितले.निमित्त आयोजित कार्यक्रमात नाम फौंडेशनचे समाज कार्यकर्ते,वृक्षमित्र रामदिप बप्पा डाके,आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक पुरी महाराज व राठोड सर,लाडाने,तिवारी पत्रकार हनुमान बडे,सुर्यकांत बडे,संतोष स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज व श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यसनाने होणारे नुकसान व व्यसनमुक्तीचा आदर्श संकल्प याबाबत मान्यवरांची भाषणे संपन्न झाली.यावेळी टकारवाडी येथील महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे आभार मानले. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय गर्दी होती. जीवन काळे रामेश्वर फाटे भास्कर पिसाळ बाळासाहेब वर्पे कुंडलिक गवळे बालाजी डावरे प्रभाकर फाटे संजय पिसाळ लखन शिंदे चंदू भोसले कल्याण काळे अनंत डाकेअण्णासाहेब शिंदे हनुमान बडे जगन्नाथ डाके महेश मोरे भास्कर पिसाळ आदिनी कार्यक्रमांमध्ये यशस्वी नियोजन केले होते.कार्यक्रमांमध्ये प्रभावी सूत्रसंचालन केल्याने शिरीषकुमार रामदासी यांनी सर्वांची मने जिंकली.