Home » महाराष्ट्र माझा » आरक्षणासाठी शिक्षकाचीही आत्महत्या..

आरक्षणासाठी शिक्षकाचीही आत्महत्या..

आरक्षणासाठी शिक्षकाचीही आत्महत्या..

डोंगरचा राजा / आँनलाईन

— आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या मन सुन्न करणारी चिठ्ठी.

लातूर — मुलाचे आणि मुलीचे उच्चशिक्षण पूर्ण होऊन हि आरक्षण नसल्याने त्यांना नौकरी लागत नसल्याने लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

माटेफळ येथील शिक्षक रमेश पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे मोठा मुलगा अजित याने २०११ मध्ये बी ए डी एड चे शिक्षण पूर्ण केले आहे मुलीने अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले आहे परंतु दोघांनाही नौकरी नसल्यामुळे ते घरीच आहेत रमेश पाटील यांनी लिहलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे कि , मी आत्महत्या करत आहे कारण मला १ मुलगा २ मुली आहेत त्यांना शिकवून काहीच उपयोग नाही कारण माझी १ मुलगी M.sc च्या वर्गात विद्यापीठातून दुसरी व लातूर जिल्ह्यातून पहिली आली आहे तरी सुद्धा आरक्षणामुळे ३ लेकरे घरीच असल्यामुळे मी निराश होऊन आत्महत्या केली आहे . तुम्हीच विचार करा शिक्षण म्हणजे काय आहे माझा पगारावर गाडा चालना गेला त्या मुले खासगी कर्ज झाल्यामुळे तसेच शासनाने माझा पत्नीला प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी पेन्शन लवकर मंजूर करून सहकार्य करावे असे त्यांनी चिट्टीत नमूद केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.