Home » माझी वडवणी » शिवसैनीकांना मातोश्रींचा आदेश – अॅड.विचारे

शिवसैनीकांना मातोश्रींचा आदेश – अॅड.विचारे

शिवसैनीकांना मातोश्रींचा आदेश – अॅड.विचारे

डोंगरचा राजा / आँनलाईन.

— वडवणीत शिवसेनेची बैठक संपन्न

— मतदारसंघावर भगवा फडकिण्यासाठी शिवसैनीकांना मातोश्रींचा आदेश
– अॅड. सुनिल विचारे

वडवणी — शिवसेना पक्षप्रमूख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा अन घर तेथे शिवसैनिक निर्माण करुन शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकलाच पाहीजे हा आदेश मातोश्रीवर घेऊन आलोय याची संपुर्ण जबाबदारी शिवसैनिकांनी पेलवायची आहे.असे मत माजलगाव विधानसभा संपर्क प्रमुख अँड सुनील विचारे यांनी वडवणीतील बैठकीत सांगितले.
आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा बिगूल आतापासूनच वाजू लागला असून शिवसेना ही तळागाळात जाऊन या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा दिल्लीच्या तख्तावर आणि महाराष्ट्राच्या विधान भवनावर फडकविण्यासाठी काल दिनांक ४ ऑगस्ट २०१८ शनिवार रोजी सकाळी ठीक १२ वाजता नगरपंचायत बचतगट भवन येथे उपजिल्हा प्रमुख संजय महाद्वार, तालुका प्रमुख विनायक मुळे याच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजलगाव मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अँड सुनील विचारे म्हणाले की बीड जिल्ह्यावर मा पक्षप्रमूखांचे विशेष लक्ष असुन यामधील शिवसेचा बालेकिल्ला असलेल्या माजलगाव मतदारसंघात संघावर भगवान फडकलाच पाहीजे त्यासाठी संपुर्ण रणनिती तयार केली आहे. सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी राणपेटवत भगवा घरोघरी पोहचवुन एकनिष्ठपणे काम करुन शिवसेना प्रमुखांच्या स्वपणातील महाराष्ट्राच्या विधानसभेवर फगवा फडकलाच पाहीजे असा आदेश आहे. त्याचे पालन आपल्याला करायचे आहे अशे मत मांडले प्रस्तावित बंडु मामा जाधव यानी केले यावेळी वैजीनाथ डिगे, उपतालुका प्रमुख माऊली गोंडे, रामदास ढगे, सर्जेराव जोगदंड, अंबादास जाधव, प्रमिलाताई माळी, मुन्नाशेट पवार, संजय धपाटे, हनुमंत शिंदे, भैय्यासाहेब खोसे, महेश जाधव,ओमराजे जाधव, वचीष्ट शेंडगे,रतन सवाशे,युवराज शिंदे, ज्ञानेश्वर जाधव,बादाडे तुकाराम,सचिन धपाटे,जालिंदर चिनके, हरीभाऊ राठोड,बिबीषन मस्के, दत्ता गोंडे, उद्धव वरकड, वसंत सावंत सह शिवसेना, युवासेना,किसानसेना,महीला आघाडीचे पदाधिकारी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.