Home » महाराष्ट्र माझा » धनगर समाजाचे धरणे आंदोलन –वाकसे

धनगर समाजाचे धरणे आंदोलन –वाकसे

धनगर समाजाचे धरणे आंदोलन –वाकसे

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— आज तहसिलसमोर धनगर समाजाचे धरणे आंदोलन .

वडवणी — धनगड व धनगर हे दोन्ही समाज एकच आहेत परंतु धनगर समाजाचा नुसता मता पुरता वापर करून दोन्ही समाज वेगवेगळे असल्याचे सांगत आहे तरी बीड जिल्ह्यात धनगड जातीचे कोण आहेत त्यांचे नावे व पत्ते जाहिर करावेत नसता धनगर व धनगड हे एकच आहेत हे जाहिर करून धनगर समाजाचा एस टी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने तहसिलदार यांना दीले आहे .
बीड जिल्ह्यात धनगड समाज नसताना शासनाने जिल्ह्यात 530 अशी लोकसंख्या दाखविल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे .तरी धनगड व धनगर हे एकच आहेत परंतु धनगर समाजाचा फक्त मता पुरता वापर करून धनगड व धनगर हे वेगळे असल्याचे सांगत आहे .तरी जिल्ह्यात धनगड कोण आहेत त्यांचे नावे व पत्ते शासनाने जाहिर करावेत नसता दोन्ही समाज एकच असल्याचे जाहिर करून धनगर समाजाचा समावेश एस.टि.मध्ये करावा यामागणी साठी आज शनिवार रोजी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदन दिले आहे वडवणी तालुका धनगर समाजाच्या वतीने दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.