Home » देश-विदेश » कोहलीचा विराट विक्रम..

कोहलीचा विराट विक्रम..

कोहलीचा विराट विक्रम..

डोंगरचा राजा / आँनलाईन..

— विराट विक्रम; सचिन, ब्रॅडमनसह दिग्गजांना टाकले मागे.

बर्मिंगहॅम येथे सुरु असेलेल्या इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहलीने १४९ धावांची दमदार खेळी केली. एकीकडे भारतीय फळंदाजांनी नांग्या टाकल्या असताना कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील २२ वे शतक ठोकले. विराट कोहलीने या शतकी खेळीसह अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. २०१४ च्या दौऱ्यामध्ये धावासाठी झगडणाऱ्या विराट कोहलीने या दौऱ्याच्या सुरुवातीलाच शतक झळकावत कोहलीने इंग्लंडला इशारा दिला आहे. २०१४ च्या दौऱ्यात कोहलीला पाच सामन्यांमध्ये फक्त १३४ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी सामन्यांत कोहलीचे हे पहिले शतक ठरले आहे.

कर्णधार म्हणून इंग्लंडमधील मोठी खेळी.

इंग्लंडमध्ये मैदानावर शतक ठोकणारा विराट कोहली तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच १४९ धावांची खेळी कर्णधार म्हणून इंग्लंडमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वोच्च खेळी अझरुद्दीनच्या नावावर आहे. १९९०मध्ये अझरुद्दीनने १७९ धावांची खेळी केली होती. अझरुद्दीनशिवाय माजी कर्णधार मन्सूर अली खान पटौदीच्या नावावर आहे. १९६७ मध्ये त्यांनी १४८ धावांची खेळी केली होती.

सचिनचा विक्रम मोडला –

११३ डावांत फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील २२ वे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला २२ शतकासाठी ११४ डाव लागले होते. याबाबतीत डॉन ब्रॅडमन सर्वात आघाडीवर आहे. ब्रॅडमन यांनी ५८ व्या डावांत २२ वे शतक झळकावले होते. तर सुनील गावसकर यांना १०१ डाव लागले होते.

बॉर्डर यांची बरोबरी तर ब्रॅडमन यांना टाकले मागे –

कर्णधारपदाची सुत्रे सांभाळल्यानंतर विराट कोहलीने हे १५ वे शतक झळकावले आहे. कर्णधार म्हणून ब्रॅडमन यांच्या नावावर १४ शतके आहेत. विराट कोहलीने त्यांना मागे टाकले. तर एलन बॉर्डर आणि स्टीव वॉ यांची बरोबरी केली आहे. एलन बॉर्डर आणि स्टीव वॉ यांच्या नावावर प्रत्येकी १५ शतके आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके दक्षिण आफ्रिकाच्या स्मिथ (२५) आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिगच्या (१९) नावावर आहेत.

७००० धावांचा पल्ला –

विराट कोहलीने कर्णधार असताना सर्वात वेगनान ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने १२४ डावांमध्ये सात हजार धावांचा पल्ला पार केला आहे. ब्रायन लाराला यासाठी १६४ डाव लागले होते. विराट कोहली आणि लारामध्ये ४० डावाचा फरक आहे. २०१४ मध्ये विराट कोहलीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद आले आहे. कर्णधारपद सांभाळताना कोहलीने कसोटीमध्ये ५८ डावांत ३५६२ धावा केल्या आहेत. याशिवाय वन-डेत ४९ डावांमध्ये ३०५९ धावा ठोकल्या आहेत. तर टी-२०च्या १७ डावांत कोहलीने ४४५ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटी, वनडे आणि टी-२० च्या एकूण १२४ डावांत सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.