Home » माझा बीड जिल्हा » आमदारांचा वारसदार चित्रकार झाला..

आमदारांचा वारसदार चित्रकार झाला..

आमदारांचा वारसदार चित्रकार झाला..
डोंगरचा राजा / ऑनलाईन
— रोहित देशमुख यांच्या चित्रकलेचे पालकमंत्री मुंडे कडून कौतुक..
 माजलगाव चे आमदार आर टी देशमुख यांचे सुपुत्र रोहित देशमुख यांनी आपल्या लाडक्या नेत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त स्वहस्ते काढलेला फोटो भेट दिला असून त्यांच्या चित्रकलेचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तब्बल सहा दिवस रात्रंदिवस परिश्रम करून रेखाटलेले चित्र हुबेहूब दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराणे चित्रकार म्हणून ओळखले जातात. तसं जिल्ह्याच्या राजकारणात एकही पुढारी अशी वेगळी कला ज्यांच्या अंगात आहे असे नाही. मात्र आमदारांचा वारसदार आणि तोही एक चित्रकार ही वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे. देशमुख हा भारतीय जनता युवा मोर्चात त्या मतदारसंघात प्रमुख कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. संयमी आणि शांत स्वभावाचा हा कार्यकर्ता संघटन व सामान्य जनतेसोबत जनसंपर्क ठेवून आहे. आमदाराचा मुलगा हा रुबाब त्याच्यात कधीच पाहायला मिळत नाही. त्यांच्यातली नम्रता, मनमिळाऊ स्वभाव त्यातुन असंख्य युवा कार्यकर्ता जोडण्याची त्यांच्यात वेगळी कला आहे. शालेय शिक्षण घेत असतांना चित्रकला हा त्यांच्या आवडीचा विषय होता. पुण्याजवळील आंबेवली च्या शाळेत चित्रकलेचे शिक्षण त्याने घेतले. राजकीय पटलावर हा कार्यकर्ता नवखा असला तरी चित्रकला मूळ त्याचा विषय आहे. राजकारणात आपल्या आवडत्या नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पुष्पगुच्छ तथा वेगवेगळ्या भेटवस्तू देतात.मात्र रोहित यांनी तब्बल आठ दिवस रात्रंदिवस परिश्रम घेत मंत्री पंकजाताई मुंडे यांचा फोटो चित्र रेखाटन केला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी रेखाटलेले चित्र मंत्रीमहोदयांना दिले ते पाहिल्यानंतर नामदार पंकजाताई यांनी रोहितचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published.