Home » माझी वडवणी » आज वडवणीत शिवसेनेची बैठक..

आज वडवणीत शिवसेनेची बैठक..

आज वडवणीत शिवसेनेची बैठक..

डोंगरचा राजा /आँनलाईन.

— निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज बैठक.

— संपर्कप्रमुख अॅड. विचारे यांची उपस्थिती.

वडवणी — आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ४ ऑगस्ट २०१८ वार शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता नगरपंचायत बचतगट भवन याठिकाणी शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस सर्व माजलगाव मतदारसंघातील शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वडवणी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे यांनी केले आहे.
याबाबत अधिक वृत्तांत असा की, आगामी लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा बिगूल आता पासूनच वाजू लागला असून शिवसेना ही तळागाळात जाऊन या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा दिल्लीच्या तख्तावर आणि महाराष्ट्राच्या विधान भवनावर
फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ४ ऑगस्ट २०१८ शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता नगरपंचायत बचतगट भवन वडवणी याठिकाणी संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या आदेशावरून माजलगाव विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख अॅड.सुनील विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन हे करण्यात आले असून यावेळी माजलगाव मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वडवणीचे शिवसेना तालुकाप्रमुख विनायक मुळे यासह वडवणी तालुका शिवसेना, युवा सेना, किसान सेना, महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.