Home » विशेष लेख » पुण्यातील बौद्ध मतदार..

पुण्यातील बौद्ध मतदार..

पुण्यातील बौद्ध मतदार..

 

डोंगरचा राजा / ऑनलाईन

 

मित्र हो सप्रेम जयभीम. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे आशिया खंडातील सर्वात जलदगतीने वाढणारी शहर. पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणा पासून सुमारे 35 ते 40 किमी अंतरापर्यंत प्रचंड प्रमाणात उच्चभ्रू च्या वस्त्या.त्याच बरोबर 1972च्या दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी मराठवाडा, खानदेश, व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातून बौद्ध, sc, st, आदिवासी भागातील लोक पुण्यात आले. त्या मध्ये बौद्ध मातंग संख्येने अधीक.

पुण्याच्या बाह्य भागांतील अनेक वस्त्यांचे तेथील लोकांचे अवलोकन केले असता ज्या वॉर्डमध्ये 80%लोकवस्ती बौध्द/मातंग समाजाची आहे तेथे ओपन चा धनिक,श्रीमंत असणारा नगर सेवक निवडून दिला जातो.अशी पुणे शहरात 37 वॉर्ड आहेत की जेथे बौद्ध, आणि मागासवर्गीय लोकसंख्या 70%पेक्षा जास्त असूनही नगर सेवक ओपन चा येतो.

पिंपरी चिंवड मध्ये 27 प्रभाग असे आहेत की,तेथे निव्वळ SC चेच नगर सेवक निवडून येऊ शकतात!

शिवाय विविध ठिकाणी सोसायटी ,कॉलनीज मधून राहणारे परंतु आपल अस्तित्व न दिसु देणारे असे 60 ते 70 हजार कुटुंबे आहेत!हे sc सुद्धा सह जीवनाच्या व्याख्येशी रममाण होऊन बौद्ध असून गणपती पूजक ना विलाजाने बनतात. त्यांची बेरीज सोसायटी वाले हिंदू म्हणूनच जमेस धरतात.

मुख्य बाब  अशी आहे की,ही आपली निव्वळ मते आर्थिक प्रलोभने अथवा राजकीय दबावाखाली ,गुंडांच्या इशाऱ्यावर

मतदान न होता मतविक्री, मतफेक होते.

आता पर्यंत काय झाले ते जाऊद्या पण आताची एकूण राज्य व देशातील सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता आता केवळ पुणे,पिंपरी चिंचवड च नव्हे तर राज्यातील अनेक अशी शहरे आहेत उदा:-नाशिक,नागपूर, भिवंडी, कल्याण , सोलापूर औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर,अंबरनाथ, उल्हासनगर , मुबईची अनेक उपनगरे, तेथे बहुसंख्येने बौद्ध, मागासवर्गीय मतदार आहेत.

शिवाय राज्यतील अन्य मोठ्या शहरांतही 20 हजाराहून अधीक मतदार आहेत.

आपण सर्वांनी जर आपल्याच पक्ष्याच्या उमेदवारास मतदान केले तर किमान 7 खासदार व 68 आमदार सहज निवडून येऊ शकतात!

या साठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव आशेचा किरण ठरू शकतात आणि ते श्यक्य पण आहे.

पण आम्ही निर्धार केला पाहिजे की, “”माझे मत मि विकणार नाही” आणि बाबासाहेबांच्या वंशजालाच मतदान करून डॉक्टर बाबासाहेबांचे “ऋणमुक्त”

होईन!

“माझ्यातील अहंकारास मी आयुष्यातून फक्त एकदाच मुठमाती  देईन””केवळ अहंकारामुळे मला व माझ्या समाजाला विपन्नावस्था आली आहे” याला मी आणि माझा अहंकाराचं कारणीभूत आहे”तो मी आज रोजी सोडून देत आहे”

इथं:पर माझे अमुल्य मत मी चवली-पावलीवर विकणार नाही अथवा अन्य प्रलोभनाला बळी पडणार नाही”अशी प्रतिज्ञा घेत आहे”

बंधूनो, बघा काय होतंयते!साधी गोष्ट, सहज होणारी गोष्ट!!केवळ आपल्या मतांवर अन्य व्यक्ती गडगंज ,श्रीमंत होणार नाही याची काळजी घेईन!.मी माझ्याच समाजातील लोकांना श्रीमंत, सधन,झालेले पाहीन!मी अन्य उमेदवारास मतदान केल्यामुळेच मी सत्तेपासून दूर आहे!पण माझ्या मतानेच झालेल्या पुढाऱ्यानेच सत्ताधीश्याने माझ्या समाजावर अन्याय केला आहे याला मीच जवाबदार आहे.मी अनेक वेळा चूका केल्या आहेत. आता येथून पुढे मी कधीही, एकदाही, चुकूनही,”चूक””Mistaks करणार नाही.मी केलेल्या चुकांमुळे व करण्यास भाग पाढलेल्या चुकांमुळे मी आणि माझा समाज बहुसंख्य असूनही सत्तेपासून दूर आहे.आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, म्हणजे माझ्या “बापाचे ऋणमुक्त होईन.

या पूर्वी मी बाळगलेला अहंकार, केलेल्या चुका दुरुस्त करण्याची शपथ घेत आहे.

एवढेच साधे आणि सोपे काम करा!माझं मत वाया जाईल याचा चुकीचा विचार करू नका!! ‘”माझं एक मत सत्तेची एक पायरी आहे “ती एक एका मताने चढत जा !जात,उपजात, पोटजात, या ऐवजी “”संवर्ग””या शब्दाला अधीक प्राध्यान्य द्या! पुन्हा चूक केली तर पुन्हा सुधारण्याची संधी कधीच नाही हे लक्षात घ्या!!

तुमच्या एकोप्यासाठी, कुणाची ही मदत घेऊ नका!!आपला संवर्ग एकजूट झाला की, मुस्लिम ,ST, आदिवासी, ओबीसी आपोआपच आपले एकजुटीमुळे आपले पाठीशी खंबीरपणे उभे राहातील !!

म्हणून 2019 ची लोकसभा निवडणुकीची येणारी संधी मी “हुकूदेणार नाही!!अशी खूण गाठ बांधा!!

(आपला अनंतराव सरवदे,से.नि.तहसीलदार, बीड)

(हा मेसेज फक्त पुणेकरासाठी नाही तर सर्व राज्यातील SC, St, बुद्धिस्ट, ओबीसी, मुस्लिम समाजातील व सत्तेपासून वंचित  समाजासाठीही आहे.)

 

अनंतराव सरवदे

सेवानिव्रत तहशिलदार

 

Leave a Reply

Your email address will not be published.