Home » महाराष्ट्र माझा » तरुणाची आत्महत्या.

तरुणाची आत्महत्या.

तरुणाची आत्महत्या.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— गरीबीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
सततची नापीकी व वडिलांच्या डोक्यावर वाढता कर्जाचा डोंगर यामुळे विवंचनेत असणाऱ्या धारुर तालुक्यातील आम्ल लिमला येथील शेतकरी तरुण मारोती सुजनराव काळे (१८) याने शेतात कापूस पिकावर किटकनाशकाची फवारणी करत असतांना तेच औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी पोलिसात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या नशीबी असलेल्या अठराविश्व दारिद्र्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतच असताना बुधवारी सायंकाळी ७ वाजता धारुर तालुक्यातील आम्ल लिमला गावातील अल्पभुधारक मारोती सुजणराव काळे या शेतकरी मुलाने किटकनाशक  प्राशन केले. लागलीच त्याला आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुरूवारी सकाळी त्याचे निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.