Home » माझी वडवणी » शेषेराव जगतापांचा रा.काॅ.ला हाबाडा..

शेषेराव जगतापांचा रा.काॅ.ला हाबाडा..

शेषेराव जगतापांचा रा.काॅ.ला हाबाडा..

डोंगरचा राजा / आँनलाईन

जगतापांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा…

वडवणी — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे वडवणी नगरपंचायत चे गटनेते शेषराव जगताप यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित वडवणी शहर विकास आघाडीच्या गटनेते पदाचा राजीनामा माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रकाश दादा सोळुंके यांच्याकडे दिला, गेल्या 1 वर्षापूर्वी पक्षनेतृत्वाने तालुका अध्यक्ष बदलल्यापासून वडवणी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अवमेळ झालेला असून पक्षाची वाटचाल रसातळाला चाललेली दिसत आहे, पक्षातील गटबाजी व पक्षांतर्गत असलेले तीव्र मतभेद आणि नेतृत्वाचा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा कानफुकणाऱ्या कार्यकर्त्यावर असलेला जास्त विश्वास आणि जनतेमध्ये पक्षाविषयी वाढत चाललेली संदिग्धता व अकार्यक्षमता यामुळे पक्षाची वडवणी तालुक्यात व शहरांमध्ये होत असलेली दुरवस्था तसेच वडवणी नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आघाडीचे आठ नगरसेवक असून आणि भाजपाचे एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून सुद्धा बहुमत असून सुद्धा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपंचायत च्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील काही नगरसेवकांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यामुळे आणि पक्षनेतृत्वाने सुद्धा लक्ष न दिल्यामुळे नगरपंचायत परत भाजपच्या ताब्यात गेली अशा अवमळअसलेल्या गटात आणि पक्षात काम करण्यापेक्षा राजीनामा देऊन पक्षाला रामराम केलेला बरा असा विचार करून आज वडवणी नगरपंचायत चे गटनेते शेषराव जगताप यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सुपूर्द केला असून लवकरच पुढील राजकीय दिशा ठरवण्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published.