Home » महाराष्ट्र माझा » आरक्षणासाठी तरुणाची रेल्वसमोर उडी..

आरक्षणासाठी तरुणाची रेल्वसमोर उडी..

आरक्षणासाठी तरुणाची रेल्वसमोर उडी..

डोंगरचा राजा / आँनलाईन.

— मराठा आरक्षणासाठी तरुणाची रेल्वसमोर उडी, आत्महत्यांचे सत्र थांबेना

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक समाज बांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. संभाजीनगरमध्ये आज एक अशीच एक घटना समोर आली असून मुकुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५१ येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. महत्वाची बाब म्हणजे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची माहिती फेसबुकवर जाहीर केली होती.

प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता, अशी माहिती मिळते. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात काल रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट चार वाजून पन्नास मिनिटांनी टाकत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुकुंदवाडीतील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.